AGM News24

Latest Online Breaking News

हेक्टरी ८ क्विंटल ची अट रद्द करून त्या एवजी प्रति हेक्टरी ४५ क्विंटल करा – आमदार .विनोद अग्रवाल

  • शेतक-यांच्या समस्यांचा निराकरण न झाल्यास आ.विनोद अग्रवाल यांच्या तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा

प्रतिनिधी / गोंदिया, दिनांक : १३ मे २०२२ : अनेक शेतक-यांनी आ.विनोद अग्रवाल यांना आपली समस्याबाबत अवगत केले असता, अनेक शेतक-यांनी धान खरेदी करीता सातबारा ऑनलाइन झाले नसल्याचे कळविले त्यासाठी सातबारा ऑनलाइन करण्याची मुद्दत समोर १० दिवस वाढविल्यास सोयीचे होईल व सध्या प्रति हेक्टरी ८ क्विंटल ची अट ठेवण्यात आलेली आहे व धानाची उपज प्रति हेक्टरी ४५ क्विंटल प्रमाणे झालेली आहे.

त्यासाठी प्रति हेक्टरी ८ क्विंटल ची अट रद्द करून त्या एवजी प्रति हेक्टरी ४५ क्विंटल प्रमाणे करणे व धान खरेदी करण्याची अंतिम मुद्दत ३० जुन पर्यंत वाढविण्यात यांवे या बाबत शेतक-यांनी कळविले असताच आ.विनोद अग्रवाल यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव वाघमारे यांच्याशी फोनवर चर्चा केली असता शेतक-यांच्या समस्यांबाबत अवगत केले व सर्व समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याकरीता राज्याचे मंत्री व सचिव यांना पत्र द्वारे मागणी सुद्धा केली आहे. त्यांनी या बाबत आ.अग्रवाल यांना समस्याचे निराकरण करणेबाबत आश्वासन सुद्धा दिले.

  • शेतक-यांचे समस्यांचे निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन – आ.विनोद अग्रवाल

आ.विनोद अग्रवाल यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव वाघमारे यांच्याशी चर्चा केली असता शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण न केल्यास तात्काळ शेतक-यांच्या हितार्थ रस्त्यावर येउन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!