AGM News24

Latest Online Breaking News

सडक-अर्जुनी पंचायत समिती येथे सभापती पदी संगीता खोब्रागडे तर उपसभापती पदी शालीदर कापगते यांची बिनविरोध निवड

सडक-अर्जुनी, गोंदिया, दिनांक : ८ मे २०२२ :- सडक-अर्जुनी पंचायत समिती च्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी सभापती संगीता खोब्रागडे तर उपसभापती शालीदर कापगते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

भाजपा चे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी निवड झालेल्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी नवे सभापती, उपसभापती, भाजप तालुका अध्यक्ष अशोक लंजे लक्ष्मीकांत धानगाये, हर्ष मोदी, मिलन राऊत, पंचायत समिती सदस्य चेतन वळगाये, विलास बागडकर, गौरेश बावनकर, सुनिल भिवगडे, पदमा परतेकी, आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!