AGM News24

Latest Online Breaking News

अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन ठार तर एक गंभीर जखमी

  • नैनपुर दुग्गीपार गावा जवळील घटना
  • आई व दोन मुलांचा जागीच मृत्यू, वडील गंभीर जखमी

AGM न्यूज24,सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक. ५ मे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील देवरी ते नागपूर मार्गातील सडक-अर्जुनी तालुक्यातील नैनपुर गावाजवळ ता.५ ला ७ . 30 वाजता मिनिटांनी अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना आहे.

सदर सविस्तर घटना अशी की लाखांदूर तालुक्यातील धरतोडा येथून देवरीकडे आज सायंकाळी ६:३० वाजता गावाजवळ एका अज्ञात ट्रकच्या धडकेत दोन मुले पत्नी जागीच ठार तर वडील गंभीर जखमी झाले आहेत त्या गंभीर जखमी ला नागपूर येथील रुग्णालयात करण्यात आले आहे. त्यात चिन्मय तुळशीराम मेश्राम वय ६ वर्ष, प्रीती तुळशीराम मेश्राम वय 34 वर्ष तर एक मुलगा बारा वर्षाचा त्याचे नाव कळू शकले नाही. वडील तुळशीराम रामा मेश्राम वय 42 हे गंभीर जखमी आहेत. त्यांना नागपूर येथे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. झालेल्या घटनेत अज्ञात वाहनाच्या धडकेत पाचशे मीटर अंतरावर त्या स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच 35 डब्ल्यू 2351 ला फरकडत नेल्याची घटना आहे. तुळशीराम रामा मेश्राम हे देवरी तालुक्यातील देऊळगाव येथे शिक्षक म्हणून पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे.

वाहनाचा शोध पोलिस घेत आहेत, पुढील तपास डूग्गीपार ठाणेदार सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!