AGM News24

Latest Online Breaking News

राका येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११३ वी जयंती साजरी

AGM News 24 उपसंपादक अरविंद मेंढे

सडक-अर्जुनी, दिनांक. ३० एप्रिल २०२२ :- भजन व कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून अंधश्रद्धा आणि जातीभेदाच्या निर्मूलनासाठी कार्य करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११३ वी जयंती आज शनिवार ३० एप्रिल रोजी विठ्ठल चौक राका येथे साजरी करण्यात आली.

गावाच्या स्वच्छतेसाठी नेहमी अग्रेसर असलेले श्री. सीतारामजी हटेले माजी ग्रा. पं. सदस्य यांच्याहस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी उपसरपंच मधुसुदनजी दोनोडे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र हटेले, AGM News 24 चे उपसंपादक अरविंद मेंढे, लक्ष्मण ब्राह्मणकर, अशोक मेंढे, केदार पातोडे, वैशांत हटेले, हितेंद्र मेंढे, गौरव हटेले, निकेश पातोडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!