AGM News24

Latest Online Breaking News

नवोदय पूर्व परीक्षा आज;652 विद्यार्थी परीक्षा देणार

पांढरी ,खजरी, सौंदड, सडक/ अर्जुनी असे चार केंद्र आहेत.

सडक-अर्जुनी दिनांक. ३०/४/२०२२ – जवाहर नवोदय विद्यालयची प्रवेश परीक्षा ता.30 ला सकाळी अकरा ते दीड वाजेपर्यंत होणार आहे .सडक अर्जुनी तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल सडक-अर्जुनी येथे 156 आर जे लोहिया सौंदळ 192 छत्रपती विद्यालय पांढरी 192 आदिवासी विकास हायस्कूल खजरी 212 असे एकूण 752 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. छत्रपती विद्यालय पांढरी येथील मुख्याध्यापक अतुल वालदे, आदिवासी विकास हायस्कूल खजरी येथील मुख्याध्यापक खुशाल कटरे, जिल्हा परिषद हायस्कूल सडक-अर्जुनी चे मुख्याध्यापक मेश्राम हे केंद्र पाहणार आहेत, तालुक्यातील नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे , विद्यार्थ्यांनी 11 वाजता वेळेवर केंद्रावर हजर राहावे, सोबत मुख्याध्यापकाची सही , शिक्का असलेला प्रवेश पत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे. असे आवाहन सडक अर्जुनी चे गटशिक्षणाधिकारी सुभाष बागडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!