AGM News24

Latest Online Breaking News

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांकरिता उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

भंडारा, साकोली: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा भंडारा च्या वतीने भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष आशिष चेडगे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 26 एप्रिल २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी साकोली यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांच्या विविध मागण्या करता निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार हा जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम करीत असतो. मात्र आज पत्रकाराची परिस्थिती अत्यंत दयनीय असून या पत्रकारांच्या विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधन्या करता व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची आज नितांत गरज आहे.

आज देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये पत्रकारांना मानधन लागू करण्यात यावे व विमा लागू करण्यात यावा , पत्रकार संघटनेला जिल्ह्यात व तालुक्यात जागा व निधी उपलब्ध करून देण्यात यावा, शासनाच्या विविध समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून पत्रकाराची नेमणूक करण्यात यावी, पत्रकार क्षेत्रात पाच वर्षे काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रकारांच्या दर्जा देण्यात यावा, बातमी व व्हिडिओ संकलन करताना पत्रकारावर अनेक हल्ले होतात त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हेगारास तात्काळ गुन्हे दाखल करून आरोपीस अटक करण्यात यावी , पत्रकारांना विनामूल्य आरोग्य सेवेचा लाभ देण्यात यावा, त्याच प्रमाणे पत्रकारांना टोलनाक्यावर टोल फ्री करण्यात यावे .इत्यादी मागण्याकरता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माहिती व सूचना प्रसारण मंत्री यांना निवेदन देण्यात आले .

निवेदन देताना साकोली तालुका अध्यक्ष निलेश झोडे ,तालुका सचिव मनीषा काशीवार, तालुका उपाध्यक्ष शेखर इसापुरे ,सहसचिव प्राध्यापक चेतक हत्तीमारे ,प्रभारी प्रसिद्धीप्रमुख मनोज गजघाट ,शहराध्यक्ष ऋग्वेद येवले ,उपाध्यक्ष ताराचंद कापगते ,सचिव रवी भोंगाने ,उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!