AGM News24

Latest Online Breaking News

लाचखोर! महिला अव्वल कारकून ६ हजार लाच प्रकरणी अडकली ACB च्या जाळ्यात

AGM News 24 – अरविंद मेंढे – उपसंपादक

गोंदिया, आमगाव, दिनांक २७ एप्रिल २०२२: आरोपी छाया वासुदेव रहांगडाले, वय ३४ वर्ष, पद अव्वल कारकून तहसील कार्यालय आमगाव, ता. आमगाव, गोंदिया (वर्ग – ३) रा.वार्ड क्र. ३, बनगाव ता.आमगाव, जिल्हा गोंदिया यांना ६.००० रुपयांची लाच स्वीकारताना (ACB) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार हे शेतकरी असुन त्यांची वडिलोपार्जित शेती मीजा सावंगी येथे भु. गट कं. २०५. आराजी ०.२८ हे. आर. व भु. गट कं. २४८ आराजी ०.८१ हे. आर. शेत जमीन असुन ती शेत जमीन त्यांचे आईचे नावाने होती.

तकारदारची आई दि. ०९.१२.२०२१ रोजी मरण पावल्याने वारसान हक्काने तकारदारचे भाउ व बहिणीचे नावे रेकॉर्डवर आले आहे. सदर जमीनीवरील हक्क सोडण्याकरीता तकारदारचे बहिणीनी दि. २३.०२.२०२२ रोजी ५०० रु. चे स्टॅम्प पेपरवर हक्क सोडण्यासंबंधी सम्मती पत्र लिहुन देउन सेतु केलेला आहे. त्यामुळे सदर जमिनीवरील तक्रारदाराचे बहिणीचे नाव कमी करण्याकरीता तहसील कार्यालय आमगाव येथे संबंधित कागदपत्रासह दि. ०२.०३.२०२२ रोजी रितसर अर्ज केला होता.

परंतु तहसील कार्यालय आमगाव येथे सदर अर्जा संबंधाने कोणतीही नोटीस आली नसल्याने तकारदार है दि. २२.०४.२०२२ रोजी तहसील कार्यालय आमगाव येथे जावुन सदरचे काम पाहणारे अव्वल कारकुन श्रीमती रहांगडाले मॅडम यांना भेटले असता गैरअर्जदार यांना तकारदाराने दिलेल्या अर्जा बाबत सांगून माझे काम आता पर्यंत का झाले नाही? असे बोलले असता गैरअर्जदार श्रीमती रहांगडाले मॅडम यांनी तकारदारास तुमचे काम करून देते परंतु त्या करीता मला ८,०००/- रु. द्यावे लागतील अशी लाच रक्कमेची मागणी केली.

त्यावेळी तक्रारदाराने त्यांना नाईलाजाने होकार दिला. तक्रारदारास गै.अ. कु. छाया वासुदेव रहांगडाले, पद अव्वल कारकुन तहसील कार्यालय आमगाव (वर्ग-३) यांना लाच रक्कम रु.८,०००/- देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी गै.अ. विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता दि. २५.०४.२०२२ रोजी ला. प्र. वि., गोंदिया येथे तक्रार नोंदविली.प्रस्तुत प्रकरणी दि. २६.०४.२०२२ रोजी गै.अ. कु. छाया वासुदेव रहांगडाले यांची तक्रारदाराकडे असलेल्या लाच मागणीच्यायोग्य पडताळणीअंती आज दि. २६.०४.२०२२ रोजी अ. यांचे विरुद तहसील कार्यालय आमगाव, जि. गोंदिया येथे लाचेचा यशस्वी सापळा रचण्यात आला.

सदर सापळा कार्यवाही दरम्यान कु. छाया वासुदेव रहांगडाले, वय ४३ वर्ष, पद अव्वल कारकुन तहसील कार्यालय आमगाव, ता. आमगाव, गोंदिया (वर्ग-३) रा. वार्ड क. ३ बनगाव, आमगाव ता. आमगाव, जि. गोंदिया यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती रु.६,०००/ लाच रकमेची पंचासमक्ष मागणी करून ती लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली. त्यावरून आरोपी विरूध्द पो.स्टे. आमगाव, जि. गोंदिया येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक श्री. मधुकर गिते, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर व श्री. पुरुषोत्तम अहेकर, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र. वि. गोंदिया यांचे मार्गदर्शनात पो.नि. अतुल तवाडे, स.फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे, पो.हवा. मिलकीराम पटले, ना.पो. शि. राजेंद्र बिसेन, संतोष शेंडे, मंगेश काहालकर, संतोष बोपचे, मनापोशि संगीता पटले, रोहिनी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे सर्व ला.प्र.वि. गोंदिया यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!