AGM News24

Latest Online Breaking News

उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे तब्बल ६५० रुग्णांनी घेतला आरोग्य मेळाव्याचा लाभ

साकोली,दिनांक. 2 3 एप्रिल 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपजिल्हा रूग्णालय साकोली येथे आरोग्य मेळावा २०२२ चे आयोजन २३ एप्रिलला झाले. यात एकुण ६५० स्त्री पुरूष रूग्णांनी आरोग्य लाभ घेतला.      

या आरोग्य शिबीरात खा. सुनिल मेंढे, माजी आ. हेमकृष्ण कापगते, पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर, शिवराम गि-हेपुंजे, प्रकाश बाळबुद्धे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.एस.फारूखी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद शामकुंवर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीपकूमार गजभिये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राकेश नंदेश्वर, जिल्हा परीषद सदस्य मदन रामटेके, माहेश्वरी नेवारे, वनिता डोये, रेखा भाजीपाले, धनवंता राऊत, जगन उईके, लखन बर्वे, हरगोविंद भेंडारकर, उषा डोंगरवार, अँड. मनिष कापगते, पंसस सौ. करंजेकर हे मंचावर हजर होते. शिबीरात नेत्र, शल्यचिकित्सा, मलेरीया, अर्निया, कान नाक घसा, दंतरोग, आयुर्वेद, त्वचा, भिषक, होमियोपैथी, रक्तदाब, शर्करा असे एकुण ६५० स्त्री पुरूष रूग्णांनी या भव्य शिबीरात आरोग्य लाभ घेतला.

आरोग्य सेवा डॉ. संतोष गाडगे, डॉ. दिपक चंदवाणी, डॉ. भाष्कर गायधने, डॉ. रूपेश बडवाईक, डॉ. राजेश चंदवाणी, डॉ. तारकेश्वरी लंजे यांनी प्रदान केली. शिबीरात संचालन रामेश्वर राखडे तर आभार डॉ. रजनी रामटेके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!