AGM News24

Latest Online Breaking News

मा. आमदार विनोद जी अग्रवाल यांचे प्रयत्ना मुळे गोंदिया जिल्यातील रोहयो कर्मचारी यांचे मानधनात वाढ

गोंदिया, दिनांक. २२ एप्रिल २०२२: जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय येथे रोहयो कर्मचारी APO, PTO व CDEO हे १० ते १४ वर्षापासून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाचे दिनांक २७ आगस्त २०१९ च्या मानधन वाढीच्या इतिवृता प्रमाणे ३ वर्षापाशून गोंदिया जिल्यातील रोहयो कर्मचारी यांना मानधन वाढ करण्यात आले नसल्याने गोंदिया जिल्यातील रोहयो कर्मचारी यांनी दिनांक २१/०३/२०२२ पासून मानधन वाढ करिता जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत काम बंद धरणे आंदोलन सुरु केले होते.

या काम बंद धरणे आंदोलनाला मा. आमदार विनोद जी अग्रवाल यांनी दिनांक २५/०३/२०२२ रोजी भेट दिली व त्याचक्षणी मंत्रालय येथील रोहयो चे सहायक संचालक मा. विजयकुमार कालवले यांचे शी गोंदिया जिल्यातील रोहयो कर्मचारी यांचे मानधन वाढ बाबद चर्चा करून, गोंदिया जिल्ह्यातील रोहयो कर्मचारी यांचे मानधन वाढ करून देण्याचे आश्वासन दिले होते. या आस्वस्नावर गोंदिया जिल्ह्यातील रोहयो कर्मचारी यांनी आपले कामबंद आंदोलन मेगे घेतले. मा. विनोद जी अग्रवाल आमदार महोदय यांनी आपल्या आस्वसना चा शब्द पाळत गोंदिया जिल्ह्यातील रोहयो कर्मचारी यांचे मानधन वाढ करण्यात सहकार्य केल्या बदल रोहयो कर्मचारी कृति समिती संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी मा. आमदार विनोद जी अग्रवाल महोदय यांचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!