AGM News24

Latest Online Breaking News

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” वर्षानिमित्त ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोर येथे भव्य मोफत आरोग्य मेळावा

अर्जुनी-मोरगाव, गोंदिया, दिनांक-२१ एप्रिल २०२२ : “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि सार्वजनिक आरोग्य महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत “ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोर” येथे “भव्य मोफत आरोग्य मेळावा” चे आयोजन करण्यात आले होते, सदर मेळाव्यास माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले उपस्थित होते.सदर भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे तालुका स्तरावर आयोजन करण्यात आलेले असून, मेळाव्यात मोफत आरोग्य विषयक जनजागृती तपासणी, उपचार तसेच लाभार्थ्यांचे “युनिक हेल्थकार्ड आयडी” तयार करण्यात येऊन वितरण करण्यात येणार आहे.याप्रसंगी जास्तीत जास्त नागरिकांनी सदर मोफत आरोग्य मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी खासदार श्री.सुनिलजी मेंन्ढे,जिल्हा परिषद सदस्य श्री.लायकरामजी भेंडारकर,सौ.रचनाताई गहाणे,सौ.जयश्रीताई देशमुख,श्री.रघुनाथजी लांजेवार,डॉ.गजानन डोंगरवार,श्री.गजेंद्रजी फुंडे,श्री.खुशाल काशिवार,श्री.व्यंकट खोब्रागडे,अर्जुनी-मोर नगराध्यक्ष सौ.मंजुषाताई बारसागडे,पंचायत समिती सदस्य डाॅ.नाजुकजी कुंभरे,श्री.नुतनलालजी सोनवाणे,श्री.होमराज पुस्तोडे,श्री.संदिपजी कापगते,श्री.प्रमोदजी लांडगे,सौ.कुंदाताई लोगडे,नगरसेवक श्री विजयजी कापगते,श्री.राधेशाम भेंडारकर,जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ अमरिश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितिन वानखेडे,उपविभागीय अधिकारी डॉ.विजयजी सुर्यवंशी,तहसीलदार श्री.विनोद मेश्राम,खंडविकास अधिकारी श्री.विलास निर्वाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय राऊत,वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र घरतकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!