AGM News24

Latest Online Breaking News

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत डोंगरगाव/खजरी येथे ओबीसी – बौद्ध संमेलन संपन्न

AGM News 24 सडक-अर्जुनी

दि.१९ एप्रिल २०२२ रोजी ग्राम डोंगरगाव/खजरी येथे परमपुज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आले व ओबीसी-बौध्द संमेलन आयोजित करण्यात आले.

यावेळी माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांची सोलर एनर्जी कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या (SECI) संचालकपदावर निवड झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवले याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्कार पात्र श्री. भुपेंद्रजी गणवीर, श्री. कालिदास सुर्यवंशी, श्री. चक्रधर लांडगे, श्री. जैपाल गजभिये, श्री..भुलेश्वर पटले, कु. कविता रंगारी, श्री. चेतन वळगाये, श्री. शालिंदर कापगते, श्री. दिनेश हुकरे, श्री. तुकाराम राणे, श्री. अंतारामजी रामटेके, श्री. नारायण मेश्राम, सौ. पुष्‍पाबाई खोटेले, सौ वंदनाबाई डोंगरवार, मिराबाई गजभिये व तीन गोल्ड मेडलिस्ट हिना चा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार मनोहररावजी चंद्रिकापुरे,वरीष्ठ संपादक श्री भुपेंद्र गणवीर,ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष श्री बबलुजी कटरे,समाज प्रबोधनकार श्री रोशन कराडे,माजी जि.प.उपाध्यक्ष छायाताई चौहान, ओबीसी संघर्ष कृती समितीचे तालुकाध्यक्ष श्री दिनेश हुकरे, रंजनाताई भोई महिला अध्यक्ष ओबीसी संघर्ष कृती समिती स/ अर्जुनी, राजेश रामटेके,जिल्हा परिषद सदस्य डॉ.भुमेश्वरजी पटले,कु.कविताताई रंगारी,सौ.निशाताई तोडासे,पंचायत समिती सदस्य चेतनजी वळगाये, शालीदरजी कापगते,सौ.संगीताताई खोब्रागडे,सौ.वर्षाताई शहारे, देवेंद्र मानकर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनिश्र्वर, राजेश मुनिश्र्वर, बिर्ला गणवीर, AGM News 24 चे उपसंपादक अरविंद (उत्तम ) मेंढे ,तुकाराम राणे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!