AGM News24

Latest Online Breaking News

आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांचे हस्ते सौंदड येथे नविन धान्य गोदामाचे उद्घाटन

AGM News 24 उपसंपादक – अरविंद मेंढे

सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक : १८ एप्रिल २०२२ :-तालुक्यातील दि. सहकारी भात गिरणी मर्या. सौंदड येथिल संस्थेच्या नविन गोदामाचे उद्घाटन १२ एप्रिल ला आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांचे हस्ते, माजी आमदार राजेंद्र जैन अध्यक्ष दि. गोंदिया डि.से.को. ऑफ़ बॅक गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली, गंगाधर परशुरामकर अध्यक्ष राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी, मधुसुदन दोनोडे माजी उपसभापती, अविनाश काशिवार सभापती कृ.उ.बा.समिती, निशाताई तोडासे जि.प.सदस्य, डॉ.रूकीराम वाढई पं.स.सदस्य, वर्षाताई शहारे पं.स. सदस्य, गायत्री इरले सरपंच, सुनिल राऊत उपसरपंच, किशोर तरोणे माजी जि.प.सदस्य, सदाशिव वलथरे दि.भंडारा डि.से.को ऑफ बॅंक. गोंदिया, केतन तुरकर अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष रमेश चु-हे यांनी प्रास्ताविकात संस्थेची दिवसेंन दिवस होणारी प्रगती व विकास यावर प्रकाश टाकला. शेतक-यांचे धान्य साठवण करिता संस्थेचे संचालक मंडळाने गोदामांची व्यवस्था यानंतर सुद्धा वाढविण्यात येईल असे आश्वासन दिले..

या प्रसंगी गंगाधर परशुरामकर जिल्हाध्यक्ष राकापा यांनी गोदाम बांधकाम संस्थेने केल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षाचे व संचालक मंडळाचे आभार मानले.मधुसुदन दोनोडे यांनी धान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे धानाचा वजन वेळेवर करण्यात यावे व शेतकऱ्यांना चांगली वागणूक देण्यात यावी असे सुचविले. या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी संस्थेची गोदाम बांधकाम केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व संस्थेच्या विकासासाठी जे काही करता येईल ते निश्चितपणाने करण्याचे आश्वासन दिले.

अध्यक्षीय भाषणात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासाठी जो टार्गेट ठरवून दिला तो पूर्ण करण्यासाठी बॅंक कटिबद्ध आहे. तसेच या संस्थेला गोदाम वितरण कामांकरिता जो काही निधीची आवश्यकता पडल्यास बॅंक अर्थसहाय्य निश्चितपणे करेल असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रमेश चु-हे, उपाध्यक्ष के.जी.बोधनकर, संचालक प्रभुदयाल लोहिया, राजेंद्र गुबरेले, संजय बैस, नलीराम चांदेवार ,पतिराम परशुरामकर, चरण शहारे, हेमराज कोरे पुष्पा निर्वाण यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे संचालन राहुल यावलकर व आभार डॉ. वाढई यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेचे सभासद व शेतकरी उपस्थित होते.को ऑफ बॅंक कडून कर्ज घेऊन गोदाम उभारणी : सौंदड येथील शेतकऱ्यांची संस्था सहकारी भात गिरणीच्या संचालक मंडळाने धान्य साठवणकरिता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदिया कडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांचे हमीभाव धान खरेदीच्या मालाची योग्य साठवण करिता दुसरा गोदाम बांधला आहे.

मागिलवर्षी एक गोदाम बांधकाम केले हे विशेष. सहकार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी पीक कर्जाची शेतकऱ्यांनी वसुली मात्र नियमित करावी असे सभासद शेतकऱ्यांना आवाहन राजेंद्र जैन यांनी केले. गोंदिया जिल्ह्यातील सहकारी राईस मिल मधील ही संस्था अग्रगण्य आहे. संस्थेची दिवसेंदिवस विकासाकडे वाटचाल सुरू असून संस्था अध्यक्ष व संचालक मंडळाचे प्रशंसनिय कार्यामुळे संस्था प्रगतीपथावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!