AGM News24

Latest Online Breaking News

ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे 18 एप्रिल रोजी आरोग्य मेळाव्याचे आयोजन

AGM NEWS 24,सडक अर्जुनी– येथील ग्रामीण रुग्णालयात भव्य तालुका आरोग्य मेळावा सोमवार 18 एप्रिल 2022 ला सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजता पर्यंत आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर व गोंदिया येथील सर्व विषयाचे नामांकित तज्ञ डॉक्टर कडून वैद्यकीय तपासणी व रोग निदान करून औषध उपचार निशुल्क केले जाईल.

मेळाव्यात माता बालक सेवा, वयोवृद्ध उपचार, संसर्गजन्य आजार सेवा, नाक, कान, घसा, उपचार, दंतरोग तपासणी, नवजात अर्भक सेवा, कुटुंबनियोजन, असंसर्गजन्य आजार सेवा, कर्करोग, मधुमेह उपचार, किशोरवयीन आरोग्यसेवा, संतती प्रतिबंधक, नेत्ररोग, मोतिया बिंदू, क्षयरोग, सिकल्सेल सेवा तसेच आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यासाठी नोंदणी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बाबत नोंदणी, आयुष्यमान भारत डिजिटल अभियान अंतर्गत हेल्थ आयडी नोंदणी, महात्मा फुले जन आरोग्य योजना बाबत नोंदणी, कुपोषित बालके, दुर्धर बालके, अति जोखमीच्या माता, गंभीर रोगाने ग्रस्त सर्व वयोगटातील रूग्ण इत्यादींना संदर्भ सेवा देऊन प्रयोगशाळा चाचण्या मोफत करण्यात येणार असून या आरोग्य मेळाव्याचा सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आपले रोगाचे निदान करून औषध उपचार करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी प्रशासन व जिल्हा आरोग्य प्रशासन गोंदिया यांनी केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!