AGM News24

Latest Online Breaking News

परमपुज्य डॉ.बाबासाहेबांच्या विचारांना आत्मसात केल्यास समाजात बंधुत्वाची भावना वाढेल – माजी आमदार राजेन्द्र जैन

गोंदिया. दि. १४ एप्रिल – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा भारतरत्न परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नवीन प्रशासकीय इमारत जवळील भारतरत्न परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केला.

सदर आयोजित कार्यक्रम माजी आमदार श्री राजेन्द्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांचा प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. माजी आमदार श्री राजेंन्द्र जैन आपल्या संबोधनात म्हणाले की, महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेबांच्या विचाराना आत्मसात करुन समाजात बंधुत्व व समताधिष्ठीत समाजाची भावना निर्माण करावी. परमपूज्य डॉ. बाबासाहेबांच्या विचाराची जाणीव करुन घेणे हि काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले. यावेळी सर्वश्री जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, देवेन्द्रनाथ चौबे, विनोद हरिणखेडे, अशोक सहारे, विनीत सहारे, नानु मुदलियार, सुनिल भोलराव, सचिन शेंडे, राजु एन.जैन, विशाल शेंडे, केतन तुरकर, सौरभ रोकडे, चंद्रकुमार चुटे, सोनु राय, लखन बहेलिया, रमन उके, राज शुक्ला, सरभ मिश्रा, दिलीप डोंगरे, सुनिल गुप्ता, सोनु येळे, कान्हा बघेले, वामन गेडाम, कपील बावनथडे व अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!