AGM News24

Latest Online Breaking News

पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी व दरोडयातील आरोपी पडणार्‍या पोलीस अधिकारी व अमलंदार यांचा सत्कार

AGM NEWS 24,

सडक अर्जुनी, गोंदिया. दि.१४ एप्रिल २०२२ पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे दि.14/04/2022 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जंयती मोठया हर्षोउल्हाषात साजरी करण्यात आली. सदर जयंती निमीत्त ठाणेदार श्री सचीन वांगडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पुजन करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याविषयी मार्गदर्शन केले व नंतर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा सडक/अर्जुनी येथे दि.03/04/2022 रोजी झालेल्या दरोडयातील आरोपीतांना मोठया शिताफीने पकडुन गुन्हा उघडकीस आणणारे सपोनि विजय शिंदे, पोउपनि जिवन पाटील , पोना सचिन गेडाम, उत्तम दहीवले यांचे पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला ठाणेदार सचिन वांगडे सा., सपोनि संजय पांढरे, सपोनि प्रमोद बांबोडे, सपोनि विजय शिंदे, पोउपनि जिवन पाटील व पोलीस स्टेशन डुग्गीपारचे पोलीस अमलंदार हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!