AGM News24

Latest Online Breaking News

दरोडा घालणारे आंतरराज्यीय टोळी चे दोन कुख्यात आरोपी डुग्गीपार पोलिसांच्या ताब्यात

AGM News 24

गोंदिया.दि. १४ एप्रिल २०२२– दिनांक ३/४/२०२२ सडक अर्जुनी येथे राहणारे फिर्यादी मनीष गुरूप्रसाद गुप्ता वय ५२ वर्षे रा. वॉर्ड क्र. १७ प्रगती कॉलनी आर के पेट्रोल पंपासमोर, सडक/अर्जुनी जिल्हा गोंदिया हे नागपूर येथुन स्पिड डिझायनर गाडीने त्यांचे सडक/अर्जुनी घरासमोर परत आले असता त्याना तेव्हा दोन इसम हातात राॅड घेऊन त्यांचे घराच्या पोर्चमध्ये दिसले असता त्याना फिर्यादीने हटकले असता फिर्यादीच्या घरामधुन आणखी पाच इसम बाहेर आले व साथ एकूण सात इसमांनी त्यांच्या हातातील लोखंडी राॅडने गाडीचे काच फोडून गाडीचे नुकसान करून गाडीत बसलेल्या फिर्यादीची पत्नी व मुलीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेले. तसेच फिर्यादीने घरात जाऊन पाहणी केली असता अनोळखी चोरट्यांनी समोरील दरवाज्याचा लॉक तोडून आत प्रवेश करून बेडरूम मधील लाकडी आरमारीतील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल एकूण किंमती ३,८४,०००-/ रु. चा मुद्देमाल चोरून नेले तसेच मोहल्ल्यातील राहणारे श्रीमती पुस्तकाला पुरुषोत्तम बोरकर वय ५६ वर्षे यांचा घराच्या समोरील दरवाज्याचा कुलूप तोडून आत प्रवेश करून एकूण किंमती २,१४,५००-/ रु. मुद्देमाल तसेच धनराज संकर डहारे वय ३८ वर्षे यांच्या घराच्या समोरील दरवाज्याचा इंटर लॉक तोडून आत प्रवेश करून एकूण किंमती १,०८,५००-/ रु मुद्देमाल असा एकूण ७,०७,०००-/ रु. चा वर्णनाचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीने रीपोर्टवरून पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा क्रमांक ६६/२०२२ कलम ३९५, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास सपोनि पांढरे, पोलीस स्टेशन डुग्गीपार यांना सोपविण्यात आले.

सदर गुन्ह्याची माहिती मिळताच श्री. विश्व पानसरे पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी तात्काळ पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे जाऊन घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासाबाबत योग्य मार्गदर्शन सूचना दिल्या व अज्ञात आरोपींचे शोध घेण्याकरिता वेगवेगळे पथक तयार करणेबाबत निर्देश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांना विश्वसनीय सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली की सदर दरोडा करणारी टोळी ही मौजा बरडीया जिल्हा नियम मध्ये प्रदेश येथील आहेत. पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्री बबन आव्हाड यांनी सदर मिळालेल्या माहिती वरून सदर आरोपींचे शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विजय शिंदे, सपोनि राहुल पाटील, पोउपनि जिवन पाटील व गोंदिया शहर येथील पोउपनि श्री सैदाने यांचे नेतृत्वात ३ पथके तयार करून जिल्हा निमच मध्ये प्रदेश येथे पाठविण्यात आली.

सदर तिन्ही पथक यांनी पोलीस स्टेशन मानसा जिल्हा निमच येथे स्थानिक पोलिसांचे मदतीने त्यांचे हद्दीतील दरोडा घालणारे टोळीचे संपूर्ण रेकॉर्ड तपासले असता मानसा पोलीस स्टेशन हद्दीतील हिस्ट्रीसिस्टर्स नामे अक्षय बाछडा, सुनील बैरागी व त्यांचे साथीदार अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात व दरोडा सारखे गंभीर गुन्हे करतात अशी माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस पथकाने स्थानिक पोलिसांचे मदतीने सापळा रचून मौजा बरडीया जिल्हा नियम मध्ये प्रदेश येथुन इसम नामे अक्षय बाछडा, सुनील बैरागी व त्यांचे साथीदार यांची राहण्याच्या ठावठिकाणाबाबत माहिती काढली परन्तु नामे अक्षय बाछडा व सुनील बैरागी पोलिसांना पाहून पळू लागले. पोलीस पथकांनी त्यांचा पाठलाग करून सदर दोन्ही इसम नामे अक्षय बाछडा व सुनील बैरागी यांना मोठ्या शीताफिने ताब्यात घेतले व स्थानिक पोलिस स्टेशन मानसा जिल्हा निमच येथे आणून त्यांना विश्वासात घेऊन सदर गुन्हाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा व त्यांच्या पाच साथीदारासह मिळुन कबुली दिली.

त्याअनुषंगाने त्यांचे इतर साथीदार यांचे शोध घेण्यात आले परन्तु ते पसार झाले होते. दिनांक. ११/४/२०२२ रोजी सदर दोन्ही आरोपी १) अक्षय ऊर्फ भोला मुकेश बाछडा वय २१ वर्ष रा. बरडीया ता. मनासा जिल्हा नियच म. प्र. २) सुनील रामुजी बैरागी वय ३३ वर्ष रा. जतपुरा ता. मनासा जिल्हा निमच म. प्र. यांना योग्य कायदेशीर कारवाई करून पुढील तपासकामी पो. स्टे. डुग्गीपार यांचे कडे देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संकेत देवळेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बबन आव्हाड, स्थागुशा, पोनि वांगडे पोलीस स्टेशन डुग्गीपार, सपोनि शिंदे, सपोनि राहुल पाटील, सपोनि पांढरे, पो. स्टे. डुग्गीपार, पोउपनि जिवन पाटील, स्थागुशा, पोउपनि सैदाने, गोंदिया शहर, पोउपनि थुल, पोउपनि उघडे, पोउपनि यादव, सफौ करपे, पोहवा टेंभरे, पोना शेख, पोना इंद्रजित बिसेन, पोना रितेश लिल्हारे, पोना दीक्षित कुमार दमाहे, पोना पालांदुरकर, पोना मारवाडे, पोना बरैया, पोना आशिष अग्निहोत्री, पोशि हंसराज भांडारकर, पोशि अजय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!