AGM News24

Latest Online Breaking News

राजभवन येथे राज्यपाल यांच्या हस्ते निमा सचिव डॉक्टर रोशन देशमुख यांनी “इंटरनेशनल लाईफ सेवर अवॉर्ड” पुरस्कार स्वीकारला

AGM NEWS 24

गोंदिया. ८ एप्रिल- संवेदना अंतर्गत रक्तदानाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निमा,गोंदिया शाखेचा महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते राजभवन येथे निमा ,गोंदिया च्या वतीने सत्कार स्वीकारताना सचिव डॉ रोशन देशमुख मागील वर्षी 23 मार्च ला शहीद दिन च्या निमित्ताने NIFAA व निमा ,केंद्रीय शाखेतर्फे आयोजित संवेदना या महारक्तदान शिबीराला ज्या NIMA शाखेने उत्कृष्ट सहकार्य केले व कोरोना काळात देशात भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन अत्यंत गरजेच्या वेळी रक्तदान शिबिर आयोजित करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली त्या उत्कृष्ट निमा शाखेचे व काही सामाजिक संघटनेचे जागतिक आरोग्य दिनी गुरुवार दि.07 एप्रिल ला राजभवन येथे “इंटरनेशनल लाईफ सेवर अवॉर्ड” देऊन महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात निमा ,गोंदिया शाखेच्या वतीने निमासचिव डॉक्टर रोशन देशमुख यांनी सत्कार स्वीकारला.

हा सत्कार आपण सर्व ज्यांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले त्यांचा व सर्व निमा ,गोंदिया सदस्यांचा आहे .त्यासाठी आपण सर्व सन्माननीय सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

आपण सर्वांचे सहकार्याने निमा शाखा उत्कृष्ट कार्य करीत आहेत ,व यासाठी लाभलेल्या आपल्या सर्वांचे सहकार्य व शुभेच्छा साठी आपले मनःपूर्वक आभार !! व आपले सहकार्य असेच राहतील किंबहुना उत्तरोत्तर वाढेल असा विश्वास आहे व त्यामुळेच निमा ,गोंदिया शाखा ही आपल्या सर्वांच्या हिताचे ,हक्कासाठी व समाजोपयोगी कार्य करीत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!