AGM News24

Latest Online Breaking News

अस्वलाच्या हल्ल्यात दोन मुली जखमी सालई टोला (शेंडा) येथील घटना

AGM NEWS 24

सडक अर्जुनी, गोंदिया: दि. 4 – वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या सालई टोला गावालगत असलेल्या शेत शिवारात आज सकाळी 8 वाजता एका अस्वलाने दोन मुलीवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे.सालई टोला येथील प्रेमा घनश्याम भोंडे वय 20 ,नेहा घनश्याम भोंडे वय 17 ह्या दोन मुली आपल्या आई सोबत जंगलालगत असलेल्या स्वतःच्या शेतात मोहफुल वेचण्यासाठी गेले, असता सकाळी 8 वाजता ता. 4 ला अस्वलाने हल्ला केल्याने जखमी केल्याची घटना घडली आहे.

मोठ्या बहिणीवर अस्वलाने हल्ला केल्यामुळे, लहान बहीण वाचवण्यासाठी गेली, असता तिच्यावरही त्या अस्वलाने हल्ला केला, त्यात लहान बहीण सुद्धा जखमी झाली, उपचारासाठी दोघींना ग्रामीण रुग्णालय सडक-अर्जुनी येथे हलविण्यात आले, पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे, घटनेची माहिती मिळताच रेंगेपार सह वनक्षेत्राचे वन कर्मचारी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी आले होते , त्या जखमींना वन विभागाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सालई टोला व परिसरातील नागरिक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!