AGM News24

Latest Online Breaking News

सडक अर्जुनी शहरात तीन ठिकाणी घरफोडी करून तोडफोड केल्याने शहरात भीतीचे वातावरण

AGM NEWS 24

सडक/अर्जुनी-गोंदिया: दि. 4- डूग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सडक अर्जुनी शहरात काल ता.3 एप्रिल ला पहाटे अडीच वाजता तीन ठिकाणी घरफोडी केल्याची घटना घडली आहे. anti viagra

सडक अर्जुनी शहरातील पेट्रोल पंप समोरील मनीष गुरुप्रसाद गुप्ता, पुस्तकला पुरुषोत्तम बोरकर ,धनराज शंकर डहारे यांच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधून सोने-चांदी, रोख रक्कम नेल्याची घटना घडली आहे. ते चोर इथेच थांबले नाही, तर मनीष गुरुप्रसाद गुप्ता हे आपल्या कुटुंबासह नागपूरहून साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून तीन वाजता आपल्या घरी आल्यावर, त्यांना पाहताच त्यांचेवर त्या सात आठ च्या संखेत असलेल्या चोरांनी हातापायी करून , कारवर हल्ला करून , कारच्या काचा फोडून पसार झाले. या चोरीच्या प्रकरणामुळे सडक अर्जुनी शहरात व परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे

घटनेची माहिती मिळताच डूग्गीपार चे ठाणेदार सचिन वांगडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाकाबंदी करण्यास सुरुवात केली ,पण त्या चोरांचा थांगपत्ता लागला नाही. सदर चोरी प्रकरणात किती लाखाचे नुकसान झाले, हे बातमी घेईपर्यंत कळू शकले नाही , घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवलेकर व एल सी बी ची टीम दाखल झाले असून पूढील तपास डूग्गीपारचे ठाणेदार सचिन वंगडे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!