AGM News24

Latest Online Breaking News

गोंदिया पोलीस दलातर्फे पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

सडक अर्जुनी- मा.श्री विश्व पानसरे पोलीस अधिक्षक सा.गोंदिया यांचे संकल्पनेतुन नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात नक्षल चळवळीला आळा बसविण्याचे उदेशाने व नक्षलग्रस्त भागातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता पोलीस विभाग व एस.आय.एस. यांचे संयुक्त विद्यमाने संरक्षण गार्ड पदासाठी दि.02/04/2022 रोजी आय.टी.आय.सडक/अर्जुनी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर रोजगार मेळाव्यात अंदाजे 400 ते 450 युवक हजर झाले होते. त्यांची शारीरीक च लेखी चाचणी होवुन त्यापैकी 53 उमेदवार यांची संरक्षण गार्ड पदासाठी निवड करण्यात असुन त्यांना दि.09/05/2022 रोजी आरा, जशपुर (छत्तीसगड) येथे प्रशिक्षणाकरीता बोलावण्यात आले आहे.

सदर रोजगार मेळावा मा.श्री विश्व पानसरे पोलीस अधिक्षक सा.गोंदिया ,मा.श्री अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक सा.गोंदिया कॅम्प देवरी, मा.श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सा.देवरी यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन डुग्गीपारचे ठाणेदार श्री सचिन वांगडे, सपोनि श्री संजय पांढरे, पोना संतोष राऊत, सचिन गेडाम, पोलीस शिपाई मंगेश डोंगरवार नक्षलसेल गोंदियाचे पोलीस हवालदार मार्टीन, ज्योती मरकाम, रेखा धुर्वे, शेखर गणवीर, पोलीस शिपाई आशिष वंजारी व एस.आय.एस. कपंनीचे कर्मचारी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!