AGM News24

Latest Online Breaking News

तालुका काँग्रेस कमेटी तर्फे केंद्र सरकारचा निषेध

AGM NEWS 24

सडक अर्जुनी, गोंदिया. : महागाई मुक्त अभियान अंतर्गत पेट्रोल,डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल व जिवनावश्यक वस्तूची भरमसाठ दरवाढ करू न स र्वसामान्य जनतेला वेठीस धरणार्‍या केंद्र सरकारच्या विरोधात तालुका काँग्रेस कमेटी सडक अर्जुनीच्यावतीने आज (ता.३१) ला दुर्गा चौक सडक अर्जुनी येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी तालुकाअध्यक्ष मधुसुदन दोनोडे, दिनेश हुकरे, दामोधर नेवारे, शहर अध्यक्ष नगरसेवक अनिल राजगिरे,तालुका महिला अध्यक्ष किरण हटवार, नगरसेवक अंकीत भेंडारकर, जिल्हा महिला महासचिव पुष्पा खोटेले, तालुका संघटक किशोर शेंडे, निशांत राऊत,शाहीद पटेल, स्वप्नील ब्राम्हणकर, चेतन नागपुरे, विकास डोंगरे, निखील कोटांगले, सुधिर शिवणकर, विस्मय बडोले, शंकर मेंढे, ताराचंद माल्दे, मनोज राऊत, शरद नागपुरे, अखिल पठान, अवेश राऊत, राशिद शेख, ललित खोटेले, व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!