AGM News24

Latest Online Breaking News

रेगुंठा येथील जगदीश वेन्नम यांना मानद डॉक्टरेट सन्मान

अहेरी – गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुका रेगुंठा येथील शैक्षणिक, सामाजिक, कला, साहित्य, सांस्कृतिक, उद्योग, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणारे जगदीश वेन्नम यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी (GURIVER NITED STATE Unibersity) च्या वतीने सामाजिक व मानवता या विषयावर सामाजिक कार्याचा आढावा घेत मानद डॉक्टरेट पदवी बहाल करून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले आहे.

जगदीश वेन्नम यांनी युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टीच्या सर्व आवश्यकतांचे पालन केल्यामुळे आणि विद्यापीठाच्या सिनेटच्या प्राधिकरणाने याद्वारे डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटीज (D.Hum) सामाजिक कार्य आणि मानविकीमध्ये विशेषज्ञ (Honoris Causa) हा पुरस्कार प्रदान केला आहे.

मा.जगदीश वेन्नम यांनी उत्कृष्ठ पदवी संपादन केल्याबद्दल दखल न्युज भारत चे रमेश बामनकर, उपक्षम रामटेके, हर्ष साखरे सह सर्व टीम ने अभिनंदन केले.परिसरातील नागरिकांनी यांच्यावर शुभेच्छाचं वर्षाव करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!