AGM News24

Latest Online Breaking News

आमदार चंद्रिकापुरेयांनी गावांना भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या

AGM NEWS 24, गोंदिया-

आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिनांक ३०/०३/२२ रोज बुधवार ला अर्जुनी/मोरगांव तालुक्यातील गावात भेट देऊन गावकऱ्यांसोबत बैठका घेऊन समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्याबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली. आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी, भरनोली, राजोली, तुकुम, कन्हाळगांव, इळदा, परसटोला, केशोरी, आदी परिसराला भेट दिली. viagra boys paris एकीकडे ते आपल्या कार्यालयात लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या तत्काळ सोडवत आहेत, तर दुसरीकडे शहर आणि ग्रामीण भागात पोहोचून समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. याच भागात आमदार चंद्रिकापुरे यांनी परसटोला येथे सभा घेतली.

गावातील विकासासाठी पुढील ५ वर्षांसाठी पसंतीक्रमानुसार गावकऱ्यांच्या सूचनांनुसार अजेंडा तयार करण्यात आला. याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या, पाटबंधारे, रस्ते, वीज विभागाच्या समस्यांबाबत ग्रामस्थांनी ग्रामस्थांना अवगत केले. आमदार चंद्रिकापुरे यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेऊन त्या लवकर सोडविण्याचे आश्वासन देतानाच आपल्या कार्यकाळात झालेली कामे लोकांसमोर ठेवले .यानंतर ते कन्हाळगांव, येथील ब्रम्हा नाईक या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. ग्रामीण भागाचा दौरा करून कन्हाळगांव येथील निवासस्थानी ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेताना आमदार म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि सुविधांच्या विस्तारासाठी काम करत आहे.

ते म्हणाले की, निवडणुका आणि कोरोना संक्रमणाचा काळ या दोन वर्षांत बराच कालावधी लोटला असला तरी अशा अनेक योजना सरकारकडून राबवण्यात आल्या, ज्यांचा थेट फायदा सर्वसामान्यांना होत आहे. ग्रामीण भागातील लोकांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी,यासाठी इळदा येथे प्राथमिक स्वास्थ्य उपकेंद्र लवकरात लवकर शुरु करण्यात येईल , शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार चंद्रिकापुरे यांनी केले.

यावेळी रायुकॉप तालुका अध्यक्ष योगेश नाकाडे, विकास रामटेके, हेमराज डोंगरे, संजय कराडे, ब्रम्हा नाईक, गौतम कराडे, संतोष साखरे, ओमेश्वर ताराम,रेखा पालीवार, नरेश कापगते,गोपाल मानकर, हरिदास मडावी, देवदास कोरोटी, श्यामराव ठलाल, सुरेश मेश्राम, नेताजी झोडे, मेहबूब पठाण, जयपाल ताराम, कनीराम नेताम, हेमराज गावडे, गौतम शहारे, पुरुषोत्तम बडोले, प्रल्हाद कांबळे, राजु तुलावी, ओमदास तिरपुडे, दिलीप वाघमारे, सुर्दशन नेवारे, हिवराज रामटेके, राउत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!