AGM News24

Latest Online Breaking News

निःशुल्क नेत्र तपासणी व उपचार शिबिर संपन्न

AGM News 24, सडक/अर्जुनी, गोंदिया

28 मार्च 2022 ला सकाळी ठिक 10:00 ते 5:00 वाजता पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (बुद्ध विहार) सौंदडयेथ मा.माजी सामाजिक न्याय मंत्री व माजी आमदार राजकुमार बडोले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा तालुका सडक – अर्जुनी व महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका सडक -अर्जुनी जिल्हा गोंदिया, द्वारा आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शिबिर व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी शिबिरामध्ये 209 लोक उपस्थित होते ऑपरेशन करीता एकूण 82 लोकांना महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर येथे इथे जाण्या – येण्याची व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे.तसेच 105 लोकांना मोफत चस्मे वाटप करण्यात आले. व 13 लोकांना औषध लिहून देण्यात आले होते.या शिबिरात महात्मे रुग्णालयाचे नेत्र तज्ञ आपली सेवा उपलब्ध करून देणार आहेत.निवड झालेल्या गरीब रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया महात्मे नेत्रपेढी व रुग्णालय नागपूर येथे मोफत केली जानार आहे.नागपूरला येण्या – जाण्याची व भोजनाची व निवासाची व्यवस्था केली जाणार आहे.

त्याच प्रमाणे उपस्थित व या शिबिराचे आयोजक म्हणून मा.हर्ष विनोदकुमार मोदी महामंत्री भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया जिल्हा.तसेच संदीपभाऊ मोदी , ओमकारजी ठेंभूर्णे , सौ.छायाताई चव्हाण, सौ.निशाताई तोडासे जिल्हा परिषद सदस्य , सौ. वर्षा सहारे पंचायत समिती सदस्य , सौ. रुपालीताई ठेभूर्णे, मा.चरणदासजी शहारे , मा. qui prescrit le viagra गणेश कापगते, मदनभाऊ साखरे,दिपक गहाने, गणेश कापगते, दीपक वंजारी, सुभाष सावरकर,आशिष राउत, ऋषभ राउततसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदधिकारी ह्या कार्यक्रमात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!