AGM News24

Latest Online Breaking News

कुणबी समाजातर्फे आंतरराष्ट्रीय धावपटू हिना मुनिश्वर हिचा सत्कार

  • मौजा राका येथे संत तुकाराम महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न

AGM न्यूज 24, सडक अर्जूनी तालुक्यातील मौजा राका येथे कुणबी समाज मंडळाच्यावतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुण्यतिथी व छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सोबतच लोकजागर चे संस्थापक ज्ञानेश वाकुडकर यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

राका येथे मागील सात वर्षांपासून राका येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पुण्यतिथी व छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यावर्षी सुद्धा समाज बांधवांना संत तुकाराम महाराजांचे विचार माहिती व्हावे यासाठी कुणबी समाजातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समारोपीय कार्यक्रम राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके यांचे अध्यक्षतेखाली, प्रमुख मार्गदर्शक म्हणून के.डी. रहिले सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच प्रमुख मान्यवर म्हणून मधुसूदन दोनोडे माजी उपसभापती पंचायत समिती सडक अर्जुनी, माधुरीताई पातोडे माजी जिल्हा परिषद सदस्य, किशोर शेंडे तालुकाध्यक्ष ओबीसी सेवासंघ, ग्रामपंचायत सदस्य शिल्पाताई चांदेवार, निर्मलाताई ब्राह्मणकर, सुषमाताई दोनोडे ,गोवर्धन दोनोडे, वामन दोनोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मानवतावादी दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून अभंग गाथा लिहिणारे व सावकारी बुडली तरी चालेल परंतु शेतकरी वाचला पाहिजे हा विचार कृतीतून अवतरणारे एक मात्र जगदगूरू संत तुकाराम महाराज झाल्याचे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मनोगतातून राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके यांनी व्यक्त केले. यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू कुमारी हिना कैलास मुनिश्वर व समाजातील दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शंकर मेंढे तर आभार निकेश पातोडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कुणबी समाज अध्यक्ष एकनाथ मेंढे,महिला प्रमुख किरणताई दोनोडे, राजकुमार बहेकार, सुधीर शिवणकर, रवींद्र दोनोडे, किशोर दोनोडे ,नामदेव भेंडारकर, चोपराम ब्राह्मणकर ,रवींद्र मारवाडे, मनोहर पातोडे, नेमीचंद खोटेले, भोजराज कावडे, यादोराव हेमने,खुशाल शेंडे, सेवक बहेकार, गणेश मेंढे यासह समाजबांधवांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!