AGM News24

Latest Online Breaking News

जि.प, पं.स पदाधिकारी निवडणुका तातडीने घ्या, भाजपचे जिल्हाधिकारी मार्फत राज्यपालांना निवेदन

गोंदिया, 21 मार्च – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला आहे. मात्र पदाधिकार्‍यांच्या निवडणुकीची अधिसूचना निघाली नाही. या निवडणुका तातडीने घेण्यात याव्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपातर्फे देण्यात आला आहे. तसे निवेदन आज 21 मार्च रोजी भाजप शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यपाल यांना पाठविण्यात आले आहे.

निवेदनानुसार, ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे जिल्ह्यात डिसेंबर 2021 व जानेवारी 2022 या दोन टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यांचा निकाल 19 जानेवारी रोजी लागला. त्याला आता दोन महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा जि.प व पं.स पदाधिकार्‍यांच्या निवडणुकीची अधिसुचना निघलेली नाही. त्यामुळे लोकतांत्रिक मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे हनन होत आहे. त्यामुळे जिप व पंस पदाधिकार्‍यांची निवडणूक त्वरीत घेण्यात यावी. जिप व पंस हे ग्रामीण यंत्रणाचे मिनी मंत्रालय असते. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील विकास कामांचा खेळखंडोबा होत आहे. आमचे संविधानिक हक्क त्वरीत द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

जिल्हाधीकाऱ्यांमार्फत निवेदन राज्यपालांसह राज्याचे मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांना देण्यात आले आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, आ. विजय रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ. संजय पुराम, माजी जि प अध्यक्ष नेतराम कटरे, संघटन महामंत्री संजय कुलकर्णी, जिप गटनेते लायकराम भेंडारकर, जि प सदस्य रचनाताई गहाने, हनुवत वट्टी, डॉ. लक्ष्मण भगत, संजय टेंभरे, सविता पुराम, पंकज रहांगडाले, रजनी कुंभरे, कविता रंगारी, ऍड. माधुरी रहांगडाले, डॉ भूमेश्वर पटले, चतुर्भुज बिसेन, तुमेश्वरी बघेले, प्रवीण पटले, अंजली अटरे, रितेशकुमार मलगाम, किशोर महारवाडे, प्रीती कतलाम, विजय उईके, लक्ष्मी तरोणे, जयश्री देशमुख, शैलेश नंदेश्वर, निशा जनबंधू तोडासे, चंद्रकला डोंगरवार, शांता देशभ्रतार, कल्पना वालोदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!