AGM News24

Latest Online Breaking News

अन् पंकजाताई मुंडेंनी बीडच्या उदयोन्मुख गायिकेला घेतलं दत्तक !

  • उत्तम गुरू मिळवून देण्यासाठी करणार प्रयत्न

मुंबई ।दिनांक १७। मूळची बीडची असलेली शामल सौंदरमल या गुणी गायिकेला एक उत्तम गुरू मिळेपर्यंत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतले आहे. पंकजाताई मुंडे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिली.

शामल सौंदरमल आणि तिचे कुटुंब सध्या मुंबईत वास्तव्यास असले तरीही ते मूळचे बीड येथील आहेत. रोजीरोटी कमावण्यासाठी मुंबईत आलेल्या या कुटुंबाचे अहोरात्र कष्ट सुरु असतात. शामलची आई किशाबाई सौंदरमल यांचाही आवाज दैवी देणगी असल्यागत असून त्यांचा व्हिडिओदेखील यापूर्वी व्हायरल झाला होता. किशाबाई या दिव्यांग आहेत.

पंकजाताई मुंडे आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाचा गौरव करणारं काव्य किशाबाई सौंदरमल यांनी लिहिलं होतं. अत्यंत साधेपणाने घरात कणिक मळताना त्यांनी गायलेलं हे गाणं पंकजाताई मुंडे यांनीच फेसबुकवर पोस्ट केलं होत. त्यानंतर आता किशाबाई यांची मुलगी शामल हिचं ‘ऐ मेर वतन के लोगो..’ हे गाणं पंकजाताईंनी फेसबुकवर पोस्ट केलं असून शामलला एक उत्तम गुरु लाभेपर्यंत आपण हिला दत्तक घेतोय, असं आश्वासनही त्यांनी दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!