AGM News24

Latest Online Breaking News

राष्ट्रीय महामार्गावर रासायनिक द्रव्याने भरलेल्या ट्रकला आग लागून ट्रक जळून भस्म

Featured Video Play Icon

सडक अर्जुनी

पोलीस स्टेशन पासून जवळच असलेल्या ससेकरण देवस्थान घाटात पश्चिम बंगाल कडे रासायनिक द्रव्य भरून जाणाऱ्या ट्रक क्र.WB23E 3093 ला अचानक पहाटे तीन वाजता आग लागून ट्रकमध्ये असलेल्या रासायनिक पदार्थाच्या आगीमुळे ज्वाला निघून रस्त्यावर आगीचे लोट दिसून येत होते त्यामुळे सकाळपर्यंत रहदारी ठप्प पडली होती, पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन वांगळे आणि महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते यांनी त्वरित दखल घेत आपल्या ताफ्यासह अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत ट्रक पूर्णता जळाला होता… पुढील तपास पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनात बीड जमादार व्यंकट नागपुरे करीत आहे.

बाम्हणी येथील देवपायली नाल्याजवळ रात्री 03.00 च्या सुमारास ट्रक क्र. WB23E3093 मधील केमिकला आग लागलेली होती. ट्रक ड्राइवर व क्लीनर कोणाही जखमी नाही. सडक अर्जुनी, देवरी, गोंदिया ची फायर ब्रिगेड गाडी घटनास्थळी आली असून आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. महामार्ग पोलिस व पो. स्टे. Duggipar चे पोलिस स्टाफ घटनास्थळी आले असून अशोका tol प्लाझा व अग्रवाल buildcom ची क्रेन व JCB च्या मदतीने जळालेला ट्रक रोडच्या बाजूला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!