AGM News24

Latest Online Breaking News

स्त्री अबला की सबला

-कविता-

म्हणती पुरुष स्त्री आहे अबला

स्त्रीही समजे स्वतःस अबला

पुरुषप्रधान व्यवस्थेचं आहे हे लेणं

अंगावरील दागिन्याप्रमाणे नका मिरवू लेणं ||१||

यावर वादावाद करिती काही महाभाग

म्हणती शरीराने दुबळी, पेटवती वादाची आग

एकमेकांस कमी लेखून आणू नका राग

का हत्तीण पुढे हत्तीच्या काफिल्याची, विचार करा सांगोपांग ||२||

शिवबांस घडणारी जिजाऊ, असे कां अबला

जोतीबास साथ सावित्रीची, असे कां अबला

बाबासाहेबांचे दुःख वेची, होई कां रमाई अबला

विमान, रेल्वे, ट्रक चालवून, स्त्री होते कां अबला ||३||

मिटवून भेदाभेद, बना स्त्री पुरुष पूरक

मिळून सारे कार्य करू मानवतेस कारक

अंगी भेदाभेद असता, बनेल देश नरक

स्त्री पुरुष भेद मिटवून बनवू देशास तारक ||४||

स्त्री बने स्त्रीची दुश्मन, हा प्रकार निराळा

बना स्त्रियांनो सखी एकमेकांची आधार देत सकला

वादंगाची दुही माजवत, करिती काही नकला

नका पेटवू माथी कुणाची डोक्यात आणू अकला ||५||

स्त्रीस अबला समजाल तर, समाज होईल दुबळा

जाईल कुटुंब रसातळास, न्याय हा आगळा

पिल्लास शिकवी शिकारी वाघीण, निसर्ग हा वेगळा

मानाचा दर्जा देऊन स्त्रीस, घोळ संपवा सगळा ||६||-

प्रा,कवयित्री माधुरी बांगडे (अतकरी)

-सिंदेवाही, जिल्हा-चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!