AGM News24

Latest Online Breaking News

सडक अर्जुनी येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हास्तरीय बैठक संपन्न

Featured Video Play Icon

सडक-अर्जुनी, दिनांक. 7: विश्व हिंदू परिषद, बजरंग दल संघटनेवर विस्तारित चर्चा करण्याकरिता व संघटन बांधणी करिता येथील आशीर्वाद लॉन येथे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मंत्र जाप करून भारत माता व प्रभू श्रीरामाचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले व हनुमान चालीसा वाचन करण्यात आले.

बैठकीत जिल्ह्यातील तसेच सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी बजरंग दल च्या नावाने काही गुंड प्रवृत्तीचे लोक गोरक्षा च्या नावावर वसुली करत असल्याचे निदर्शनास आणून देत अशा प्रवृत्तीच्या लोकांवर आळा घालण्याकरीता प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देऊन बजरंग दलाचे नाव बदनाम करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी असे विचार मांडले.

बैठकीला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष भिकमचंद शर्मा, विदर्भ प्रांत सहमंत्री देवेश मिश्रा, विभाग मंत्री रमन सिंगल भंडारा, बजरंग दलाचे विदर्भ प्रांत सहसंयोजक नवीन जैन, जिल्हा उपाध्यक्ष गिरीश बागडे मनोज पारेख जिल्हा मंत्री सचिन चौरशिया, सडक अर्जुनी चे तालुका अध्यक्ष अनिल मुनिश्वर, मुन्ना लिल्हारे, फत्तेसिंह सगगु, रमेश म्हस्के, आनंद अग्रवाल, मुक्तानंद ढुमणे, बद्रीप्रसाद दसरिया, मनोहर वालेचा, कबीरसिंग बैस, दिलीप कुंगवाणी, दारा भाऊ बैरीसाल, मंत्री धीरज अग्रवाल, महेंद्र देशमुख, उपराळे, अंकित कुलकर्णी, अशोक हेमने,अशोक लंजे, आकाश चंदनबटवे,धनीराम पातोडे, लीलेश्वर बोरकर, अंकुश वंजारी, रमेश लांजेवार ,विनोद बारसागडे,मातृशक्ती पदाधिकारी अंजली मुनीश्वर, प्रीती अग्रवाल,मीनाक्षी बोरकर,स्नेहल विटणकर, मनीषा नेवारे, आरती सरई, रुपाली रोकडे, गीता ब्राह्मणकर, तपस्या सेंगर, रीता अरोरा, नीलिमा सोलंकी, तसेच शेकडोंच्या संख्येत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शेवटी जय श्रीरामाच्या घोषणेने कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर चहा भोजनाचा उपस्थित सर्वांनी आस्वाद घेतला कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सडक अर्जुनी चे अध्यक्ष अनिल मुनिश्वर तसेच मंत्री धीरज अग्रवाल यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!