AGM News24

Latest Online Breaking News

सौंदळ गावची ग्रामसभा शांततेत, घरकुल व इतर विषयावर चर्चा करून सरपंचांनी केला गावच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न.

AGM न्यूज 24,सडक अर्जुनी, गोंदिया

तालुक्यातील सर्वात मोठी लोकवस्ती असलेले गाव सौंदड येथे 3 मार्च 2022 ला आयोजित ग्रामसभेत घरकुल व इतर विषयांवर चर्चा करण्याकरिता मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग दिसून आला. यावेळी ग्राम विकास अधिकारी जगदीश नागलवाडे यांनी ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच सौ. गायत्री इरले यांच्या सूचनेनुसार घरकुल व इतर विषयांवर चर्चा ठरवून घडवून आणली व घरकुलची यादीचे वाचन केले यावर गावकऱ्यांनी समाधान मानून इतर लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करण्याकरिता लाभार्थ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले तसेच पाणीपुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण यावर सरपंच यांनी तोडगा काढत ठराव मांडले त्यानुसार काम केली जातील असे ग्रामसभेला सांगितले, कोरोणा काळानंतर झालेल्या ग्रामसभा शांततेत पार पाडण्यासाठी गावच्या जनतेने सहकार्य केल्याबद्दल सरपंच सौ. इरले यांनी सर्व गावकऱ्यांचे व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व गावकऱ्यांनी गावाच्या विकासात हातभार लावण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे असे आवाहन केले… यावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता बीट जमादार रवी चौधरी व सुभाष डोंगरवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!