AGM News24

Latest Online Breaking News

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा महिला युवती अध्यक्षपदी पत्रकार रोहिणी रणदिवे यांची निवड

AGM News 24

भंडारा,दिनांक. 3 : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा महिला युवती अध्यक्षपदी दैनिक गोंदिया पत्रिका या वृत्तपत्राच्या पत्रकार रोहिणी रणदिवे यांची निवड करण्यात आली आहे.

रोहिणी रणदिवे गेल्या काही वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रोहिणी रणदिवे संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू ,युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, संघटक श्रीनिवास माने, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत ताद लापूरकर, संघटक साहेबराव कोळंबिकर, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संघटक संजय लांडगे, महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. देवराव तायडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, विदर्भ सरचिटणीस प्रा. शेखर बोरकर, भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 31मार्च, 2022 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार आहे. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!