AGM News24

Latest Online Breaking News

65 हजाराची लाच घेतांना देवरीचे बीडीओ चंद्रमणी मोडक एसीबीच्या जाळ्यात

AGM न्यूज 24,गोंदिया, दिनांक. 2 : जिल्ह्यातील देवरी पंचायत समिति चे खंड विकास अधिकारी चंद्रमणि लक्ष्मणराव मोडक वय 57 हे आज दुपारी दोनच्या दरम्यान लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.

विस्तृत माहिती अशी की बिल पास करून देण्याच्या ऐवजी तक्रारदाराकडून खंड विकास अधिकाऱ्यांनी एक लाख रुपये इतकी लाच मागितली होती त्यातील 30 हजार रुपए पूर्वीच देण्यात आले होते व उरलेले 70 हजार रुपये देने भागपडत नव्हते म्हणून तक्रारदारने लाचलूचपत विभागाकडे धाव घेतली 70 हजार रुपए मधून 5 हजार रुपये सूट स्वरुपात कमी करण्यात आले होते व उरलेली 65000/-रुपये आज बुधवार दि.०२/०३/२२रोजी देण्याचे ठरले होते.

लाचलूचपत विभागाकडून सापडा रचुन तक्रारदाराकडून ही रक्कम खंड विकास अधिकारी यांना देण्यात आली रक्कम देतेवेळी लाचलूचपत विभागाचे कर्मचार्यांनी त्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकड़ले.

पुढील कारवाई पोलीस अधीक्षक लाचलूचपत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ए. पी.आय.अहिरकर व त्यांची चमु करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!