AGM News24

Latest Online Breaking News

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ३ गोल्ड मेडलिस्ट हिना चा सत्कार

  • प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हिना ला दिले दहा हजाराचे बक्षीस.
  • हिना ने तब्बल तीन वेळा गोल्ड मेडल जिंकून तालुक्यासह देशाचा नाव उंचावला.

गोंदिया, सडक-अर्जुनी, दिनांक.०१: पुर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील तालुका सडक अर्जुनी च्या केसलवाडा या खेड्यात राहणाऱ्या कु.हिना कैलास मुनिश्वर हिने नेपाळ येथील पोखरा येथे ३००० मीटर आंतरराष्ट्रीय दौड स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

अगदी बेताचीच परिस्थिती असूनही जीईस माध्यमिक शाळा सडक अर्जुनी येथे इयत्ता नववीत शिकत आहे. झोपडीवजा घरात आई, वडील,आजी, आजोबा आणि ७ वीत शिकणारी लहान बहीण मोहिनी सह राहणारी हिनाचे आई वडील मोलमजुरी करून मुलिंच शिक्षण करीत आहेत.

अशातच इयत्ता सहावी पासून हिना आपल्या वडिलां सोबत रोज सकाळी सायकल घेऊन फिरायला जायची. वडिलांनी आपल्या मुलिची धावन्याची आवड बघून रोज सकाळी तीला धावण्याचा सराव करायला घेऊन जायचे.

बघता बघता हिनाला धावण्याची सवय लागली आणि तीने मागे न बघता धावू लागली. विभागीय स्तरावर दौड स्पर्धेत विजयी झाली. तिचा आत्मविश्वास निर्माण झाला आणि उत्तर प्रदेश येथील प्रयाग येथे आणि गोवा येथील मापुसा येथेही राष्ट्रीय स्तरावर ३००० मिटर दौड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

नुकताच नेपाल येथील पोखरा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर ३००० मीटर दौड स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून तिने आपल गाव, तालुका जिल्हा राज्य आणि देशाचा नावलौकिक केल.हिनाच्या यशाबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले हे महाशिवरात्री यात्रे निमिमिताने अर्जुनी मोर तालुक्याच्या दौ-यावर असतांना आज गोठणगाव येथिल विश्राम गृहामध्ये एका छोटे खानी कार्यक्रमात सड़क अर्जुनी तालुका कांग्रेस कमेटी च्या सौजन्याने गोल्ड मेडल विजेता धावपटू कु हिना कैलास मुनिश्वर हिचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या हस्ते प्रोत्साहन पर शाल श्रीफळ व रोख 10,000 दहा हजार रुपये बक्षिस देवुन सत्कार करण्यात आला व भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सड़क अर्जुनी तालुका कांग्रेस कमेटी चे पदाधिकारी तालुका संघटक किशोर शेंडे, जिल्हा महासचिव दामोदर नेवारे, जिल्हा महासचिव पुष्पा खोटेले, युवक कांग्रेस अध्यक्ष निशात राऊत, तालुका महिला कांग्रेस कमेटी अध्यक्षा किरण हटवार, तालुका महासचिव धनराज आषटकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!