AGM News24

Latest Online Breaking News

श्री. संताजी स्नेही समाज मंडळाच्या वतीने संचालन मंडळाची बैठक संपन्न

तुमसर : श्री. संताजी मंगल कार्यालय राजेंद्र नगर येथे दिनांक: २७/२/२०२२ रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकी मध्ये तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे -आमदार मा . श्रीमान राजु जी भाऊ कारेमोरे यांच्या आमदार निधी अंतर्गत श्री संताजी मंगल कार्यालय तुमसर इथे आवश्यक असलेल्या बांधकामा करीता निधी उपलब्ध व्हावी या करीता बैठक घेण्यात आली होती.

यावेळी आमदार मा. राजु कारेमोरे यांनी आपल्या आमदार निधी अंतर्गत श्री. संताजी मंगल कार्यालय इथे आवश्यक बांधकामा करीता जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन सर्व संचालक मंडळातील सदस्यांना दिले .

या बैठकीला आमदार मा.राजु कारेमोरे, बरडे जी अध्यक्ष श्री. संताजी स्नेही समाज मंडळ तुमसर, विनोद मानापुरे सचिव श्री.संताजी स्नेही समाज मंडळ तुमसर, पुरषोत्तम बडवाईक कोषाध्यक्ष श्री.संताजी स्नेही समाज मंडळ तुमसर, सुधाकर कारेमोरे सहसचिव श्री.संताजी स्नेही समाज मंडळ तुमसर, सुरेश कुंभलकर संचालक श्री.संताजी स्नेही समाज मंडळ तुमसर, अनिल लांजेवार संचालक श्री.संताजी स्नेही समाज मंडळ तुमसर, सुनिल लांजेवार संचालक श्री.संताजी स्नेही समाज मंडळ तुमसर, राजेंद्र भुरे संचालक श्री.संताजी स्नेही समाज मंडळ तुमसर, विजय गिरिपुंजे संचालक श्री.संताजी स्नेही समाज मंडळ तुमसर, अनिल कारेमोरे संचालक श्री.संताजी स्नेही समाज मंडळ तुमसर, सौ. सरोज ताई भुरे संचालक श्री.संताजी स्नेही समाज मंडळ तुमसर, दिलीप तिमांडे संचालक श्री.संताजी स्नेही समाज मंडळ तुमसर, सौ. वंदना ताई आकरे व इतर सन्माननिय पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!