AGM News24

Latest Online Breaking News

भंडारा जिल्ह्यातील वसतीगृहातील अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग

  • माजी जिल्हा परिषद अध्यक्षावर गुन्हा दाखल

AGM News 24 वृत्तसेवा

भंडारा : वसतीगृहात राहणार्‍या दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यीनीचा विनयभंग केल्या प्रकरणी भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेध शामकुवर याच्याविरुद्ध बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक (पास्को) कायदा व विनयभंगाचा गुन्हा मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला.

सुमेध शामकुवर हा राष्ट्रवादीचा नेता असुन गुन्हा दाखल झाला तेव्हा पासून पसार आहे. विशेष म्हणजे शामकुवरच त्या वसतीगृहाचा संचालक आहे. भंडारा येथील राजीव गांधी चौकात समाज कल्याण अंतर्गत ग्रामीण विकास संस्थेद्वारे संचालित वसतीगृह आहे. त्या वसतीगृहात मोहाडी तालुक्यातील एक विद्यार्थीनी राहते. ती काही दिवसापूर्वी आपल्या गावी गेली होती. शुक्रवारी शामकुवर यांनी विद्यार्थीनीच्या वडिलांना फोन केला. आणि मुलीला घ्यायला आल्याचे सांगितले.

वडीलांनी मोठ्या विश्वासाने शामकुवर यांच्या चारचाकी वाहनात बसवून दिले भंडारा कडे येत असतांना मोहाडी तालुक्यातील डोंगरवार ते विहीरगाव मार्गावर एका ठिकाणी चारचाकी वाहन थांबवून तिचा विनयभंग केला. त्यानंतर ते दोघेही वसतीगृहात पोहचले. हा प्रकार तिने आपल्या मैत्रिणींना सांगितला. मैत्रिणीने त्या विद्यार्थ्यीनीच्या वडीलांना माहिती दिली. त्यावरून रात्री वडीलांनी आंधळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

शामकुवर पसार असून त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे मोठे पथक रवाना झाल्याची माहिती आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांनी दिली. पूर्वी कॉग्रेस मध्ये असलेले आणि आता राष्ट्रवादीत असलेल्या शामकुवर यांच्यावर गुन्हा दाखल होताच जिल्हाच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!