AGM News24

Latest Online Breaking News

बोपाबोडी येथे पल्स पोलीओ मोहीमेस प्रारंभ

AGM News 24 प्रतिनिधी

सडक-अर्जुनी. दिं. २७ : तालुक्यातील बोपाबोडी येथील आरोग्यवर्धिनी केंद्र येथे पल्स पोलीओ मोहीमेचा शुभारंभ गावचे प्रथम नागरिक सरपंच रंजना गोबाडे यांच्या हस्ते प्रथम लाभार्थी चिमुकल्या मुलाला पोलीओचा डोस पाजून मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपसरपंच वैशाली रामटेके, ग्रामसेविका रजनी शहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा किरसान, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. धिरेन मानकर, सिस्टर निरंजना पंचबुद्धे, आरोग्य सेविका खोमती चारमोडे, आरोग्य सेवक सी.बी राऊत, अंगणवाडी सेविका रेखा सेलोकर, अंगणवाडी सेविका छाया गजापुरे, मदतनीस मनिषा मलखांबे व गावकरी उपस्थितीत होते.

या मोहिमेत ० ते ५ वर्षाच्या आतील १११ बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. या राष्ट्रीय आरोग्य मोहीमेच्या कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळ जवळ १००% उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!