AGM News24

Latest Online Breaking News

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल गोंदिया मध्ये “मराठी भाषा दिवस” साजरा

AGM News 24 वृत्तसेवा

गोंदिया : पोदार इंटरनेशनल स्कूल, गोंदिया इथे दरवर्षी प्रमाणे मराठी दिन साजरा करण्यात आला. ‘मराठी दिवस हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून ओळखण्यात येतो. 27 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांचा जन्मदिवसा निमित्य साजरा करण्यात येतो.

मराठी दिवस साजरा करण्यासाठी पोदार इंटरनेशनल स्कूल, गोदिया मध्ये शाळेचे प्राचार्य श्री. महेन्द्र जगदाळे सर, शाळेचे प्रशासकीय अधिकारी रवि जयस्वाल आणि पोदार जम्बों किड्सच्या मुख्यध्यापिका सुमन खड़ेलवाल उपरस्थित होते. प्रमुख पाहुणें म्हणून उपस्थित श्री. मिलिद रंगारी हे एक साहित्यिक, कवी, नाटककार आहेत. त्यांची प्रमुख काही साहित्यप्रकाशित आहेत. ते जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसाय विकास संस्था गोंदिया येथे समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.

सर्वात प्रथम जेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाड़कर यांचा प्रतिमेवर माल्यार्पण करून दिपप्रज्वलित करण्यात आले. आलेले प्रमखु पाहणे मिलिदं रंगारी सर यांचे स्वागत शाळेचे प्राचार्य महेंद्र जगदाळे सर यांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छा पत्र देवून केले. कार्यक्रमाची सुरवात ही शाळेचे विदयार्थी वेदांत बाकरे आणि ओमी रत्नपारखी यांनी मराठी भाषा दिनाची प्रस्तावना देवून कार्यक्रमाची रुपरेखा सांगितली. कार्यक्रमात मराठी सण आणि स माहिती नाट्यरूपात सादर करण्यात आली. प्रथम वासुदेव मंचावर आला आणि त्यांने सुंदर प्रस्तुतीकरण सादर केले. त्यानंतर गुढीपाढवा, गुरूपोर्णिमा, वट्पोर्णिमा, आषाढी एकादशी, पोळा या सर्व मराठी सणाचे नाटय रूपी प्रस्तुती करून विद्यार्थ्यांनी सर्वांचे मन मोहून घेतले. कु. भाग्यश्री देवकाते, कुणाल कवास व शर्वरी दरवडे यांनी मराठी लेखकांविषयी माहिती सादर केली.

नंतर मंचावर उपस्थित प्रमखु पाहुणे श्री. मिलिदं रंगारी यांनी मराठी दिना निमित्याने त्याचे महत्व आपल्या विचारान द्वारे विद्यार्थाना सांगितले. शाळेचेप्राचार्य श्री. महेन्द्र जगदाळे सर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून विद्यार्थ्यांना मराठी दिवसाचे महत्व पटवून दिले. हया कार्यक्रमाला यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शिक्षकवृन्द व इतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!