AGM News24

Latest Online Breaking News

तुमसर येथे खासदार मा. श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न

AGM News 24

  • नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती व सदस्यांचा सत्कार

तुमसर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय तुमसर येथे खासदार मा. श्री प्रफुल पटेल जी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमसर विधानसभा च्या वतीने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती तुमसर तालुका नवनिर्वाचित सदस्य श्री राजू देशभ्रतार, श्री राजेंद्र ढबाले, सौ.सुषमा पारधी, सौ. भोजवंता धुर्वे, सौ. मीनाक्षी शहारे, सौ.दीपमाला भवसागर, सौ.आम्रपाली पटले, श्री मनोज झुरमुरे, श्री हिराचंद पुरामकर, मोहाडी तालुका नवनिर्वाचित सदस्य श्री सचिन गायधने, श्री पवनकुमार चव्हाण,सौ. सुमन मेहर, सौ.मनीषा गायधने, सौ.वंदना पराते, सौ.रेखा हेडाऊ,श्री लालाजी तरारे, सौ.अनिता नालगोपुलवार, श्री आनंद मालेवार, श्री एकनाथ फेंडर, श्री नरेश ईश्वरकर, श्री महादेव पचघरे, मोहाडी नगरपंचायत नवनिर्वाचित सदस्य श्री रितेश वासनिक, श्री बाणा सव्वालाखे, श्री उमेश भोंगाडे, सौ.आशा बोन्द्रे,सौ. प्रीती शेंडे, सौ.वंदना सोयाम नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार खासदार श्री प्रफुल पटेल जी यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी श्री पटेल संबोधन करताना म्हणाले की, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील तालुक्यातील निकाल धक्कादायक आले. निवडणुकीत झालेल्या काही चुकांपासुन बोध घेत भविष्यात यश कशाप्रकारे मिळेल या करीता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे तसेच पक्षात क्रियाशील सभासदांची नोंदणी करून पक्ष संगठन मजबूत करावा लागेल, पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी विस्वासाने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन श्री पटेल यांनी केले.

कार्यक्रम प्रसंगी सर्वश्री माज़ी आमदार राजेंद्र जैन, नानाभाऊ पंचबुद्धे, मधुकर कुकडे, राजुभाऊ कारेमोरे, अनिल बावनकर, विठ्ठल काहलकर, देवचंद ठाकरे, विजयकुमार डेकाटे, सदाशिव ढेंगे, रिता हलमारे, वासुदेव बांते, सुरेश रहांगडाले, धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे, प्रेरणा तुरकर, पमा ठाकूर, राजेश देशमुख, योगेश सिंगनजुडे, निशिकांत पेठे, शिशुपाल गौपाले, सलाम तुरक, मनोज वासनिक, संजय चोपकर, याशीं छावारे, नानू परमार, डॉ. मुंगूसमारे, विजया चोपकर, सरोज भुरे, जयश्री गभणे,कविता साखरवडे, मीना गाढवे, वंदना आकरे,खुशालता गजभिये, मधुमती साखरवाडे, नेहा मोटघरे, प्रदीप भरणेकर,देवें सहारे, मनोज झुरमुरे, संजू रहांगडाले, राजन भगत, महादेव पचघरे, संजय लाखा, खेमराज गभणे, अनिल साठवणे, विक्रम लांजेवार,खुशाल भोंडेकर, सचिन बावनकर, गुलशन बारसागडे, श्याम भैरम, पिंटू तरारे, अरुण गजभिये, धनराज मेश्राम, मनोहर साठवणे, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित होते.

या कार्यक्रमा दरम्यान श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेऊन राजमुद्रा ग्रुप चे श्री सागर गभणे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. श्री पटेल यांनी सर्व प्रवेशीतांचे पक्षाचा दुपट्टा वापरून पक्षात स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!