AGM News24

Latest Online Breaking News

गोरक्षक कार्यकर्त्यांनी केली बारा गोवंशाची मुक्तता

AGM न्यूज 24 वृत्तसेवा

सडक-अर्जुनी, गोंदिया : मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गो तस्करी वर आळा घालण्यात पोलिस प्रशासन कमी पडत असताना गोरक्षक कार्यकर्त्यांनी गोवंशाची होत असलेली तस्करी थांबविण्याकरिता पोलिसांच्या मदतीने रात्रीच्या वेळी डव्वा परिसरातून बोलेरो पिकप वाहनातून गोवंश निर्दयीपणे कुठलेही चारा-पाण्याची व्यवस्था न करता नेत असल्याचे माहिती मिळाल्यावरून ते वाहन पकडून त्यातील 4 बैल, व आठ गाई, असा 12 गोवंश व बोलेरो पिकप वाहन क्रमांक एम एच 40 बी एल 2544, अंदाजे किंमत 2,24,000 ₹ मुद्देमाल सहित पोलीस स्टेशन येथे फिर्यादी पोलीस शिपाई महेश धूर्वे याच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 38/ 2022 कलम 11 (1)(ड) प्रा. नि. वा. का. 1960 कलम 6,9 राष्ट्रीय पशु संवर्धन अधिनियम 2015 नुसार आरोपी रोशन ओमकार तरारे वय 32 वर्षे राहणार चंगेरा,पो. रावणवाडी जिल्हा गोंदिया याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस देवरी न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीस भंडारा कारागृहात पुढील आदेशापर्यंत रवानगी करण्यात आली असल्याचे बीट जमादार शिवलाल धावडे यांनी सांगितले, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार शिवलाल धावडे करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!