AGM News24

Latest Online Breaking News

मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

AGM न्यूज 24

भंडारा,दिनांक. 24 : इडी कडून अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रसचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी खा.सुनिल मेंढे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने भंडारा शहरात निदर्शने केली.काल प्रवर्तन महासंचालनालय म्हणजेच इडीने जमीन घोटाळा प्रकरणात चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक केली न्यायालयाने तीन मार्च पर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे.

नवाब मलिक यांनी भारताच्या गुन्हेगार व देशद्रोह्यासोबत कट कारस्थान करून जमीन व्यवहार केले आहेत. दरम्यान अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज भाजप च्या वतीने आंदोलन करण्यात आले. खा.सुनिल मेंढे, जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुजे, मा.हेमंत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनादरम्यान राज्यातील महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने अटक झालेल्या मलिक यांनी नैतिकता असेल तर ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी केली गेली.

यावेळी एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. आंदोलनादरम्यान जिल्हा परिषदेचे गटनेते विनोद बांते, पवनी तालुका भाजपा अध्यक्ष मा.मोहन सुरकर, भंडारा शहर अध्यक्ष मा.संजय कुंभलकर, सौ. माधुरीताई नखाते, मा.नितीन कडव, मा.मयूर बिसेन, मा.कंवलजीतसिंग चढ्ढा, मा.आशु गोंडाणे, मा.महेंद्र निंबार्ते, मा.संतोष त्रिवेदी, मा.नीलकंठ कायते, मा.अनुप ढोके, मा.रोशन काटेखाये, मा. आकाश फाले, मा.अमित बिसने, मा.शैलेन्द्र श्रीवास्तव, मा.प्रकाश कुर्झेकर, मा.पपू खैरे, मा.मंगेश वंजारी, मा.मनोज बोरकर मा.कलीम खान, मा. हिरालाल वैद्य, मा.अतुल वैरागडकर, मा.अंकुश कळंबे, मा.भूपेश तलमले, मा.किशोर ठाकरे, मा.प्रवीण गभने, मा.अमोल शहारे, मा.ओजल शरणागत, मा.भुषण महाकाळकर, मा.करमचंद वैरागडे, मा.डेव्हिड पारधी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!