AGM News24

Latest Online Breaking News

तुमसर येथे राजमुद्रा ग्रुप तर्फे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

  • बाईक रॅली शोभायात्रेचे आयोजन
  • रुग्णांना व नातेवाईकांना फळ वितरण

तुमसर : केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राज्य स्थापन करनारे युग पुरुष होते. त्यांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन केलं महाराजांसारख्या युगपुरुषाने महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपले भाग्य आहे. ४०० वर्षानंतरही शिवाजी महाराजांनविषयी नव्या पिढीच्या मनात आदर आणी अभिमान कायम आहे. महाराजांच्या नावाने प्रतेक पिढीला शौर्याची आणि जनकल्याणाची प्रेरणा दिली आहे.

दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून बाईक रॅली काढण्यात आली. शहरातील बाजार समिती, बस स्थानक, शासकीय रुग्णालय व इतर ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राजमुद्रा ग्रुप घे संस्थापक अध्यक्ष इंजीनियर. सागर मनोहर गभणे यांनी राजमुद्रा ग्रुप हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाची शिकवण आजच्या पिढीला पटवून देण्यासाठी शिवजन्मोत्सव नेहमी साजरा करण्यात येईल असे सांगितले व दुपारी शासकीय रुग्णालयात सर्व रुग्णांना व नातेवाईकांना फळ वितरण करण्यात आले व सायंकाळी ४ वाजता शोभायात्रा काढण्यात आली होती.

शोभायात्रा तहसील कार्यालयाच्या समोरून निघून संपुर्ण शहरभर फिरली यात सर्व धर्म समभाव अशी झाली तयार करण्यात आली होती. कार्यक्रमाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शहरातील सर्व महिलांचा पुढाकार, डोक्यावर भगवे फेटे, हातात भगवे झेंडे आणी मुखातून जय भवानी जय शिवाजी असा जयघोष शहरात गुंजत होता. संपूर्ण शहर शिवजन्मोत्सवाने दुमदुमला होता.

यावेळी राजमुद्रा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष इंजीनियर. सागर गभणे व राजमुद्रा ग्रुप चे सर्व सदस्य आणी मोठ्या संख्येने तुमसर नगरीचे नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!