AGM News24

Latest Online Breaking News

पळसगाव/ राका शाळेच्या सर्वंकष भौतिक विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार-आमदार मनोहर चंद्रिकापूरे

AGM न्यूज 24, सडक अर्जुनी, गोंदिया

मनरेगा अंतर्गत विविध विकासकामांचे केले भूमिपूजन

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव/ राका येथे मनरेगा अंतर्गत शाळेतील मंजूर झालेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी विद्यार्थ्यांसोबत तब्बल दीड तास संवाद साधून विविध प्रकारचे प्रश्न विचारले.शाळेतील पहिले पासून ते सातवी पर्यतच्या विद्यार्थ्यांनी सूद्धा दिलखुलास पणे आमदार महोदयांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली…. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची संगणक हाताळणी पाहून शाळेला संगणक संच देण्याचे आश्वासन आमदार महोदयांनी दिले…. सोबतच मुलांनी तयार केलेल्या परसबागेचे निरीक्षण करून सेंद्रिय परसबागेचे आमदार महोदयांनी कौतुक केले… परसबागेतील भाजीपाला विद्यार्थ्यांनी आमदार महोदयांना दिला.त्यामोबदल्यात साहेबांनी विद्यार्थ्यांना पाचशे रुपये देवून विद्यार्थ्यांना शाबासकी दिली.यावेळी कार्यक्रमाचे संचालन नितीन अंबादे यांनी केले तर आभार मूख्याध्यापक एस.आर.फूंडे यांनी मानले.

यावेळी गावचे सरपंच सौ.भारतीताई लोथे ,ग्रामपंचायत सदस्य श्री. सूभाष कापगते, सौ.पूजा कापगते, सौ.सविता मल्लेवार,सौ.कुंदा सावरकर,प्रतिष्ठित नागरिक अशोक कापगते,शा. Un questionnaire, https://asgg.fr/ préalablement rempli par l’internaute, permet d’apporter une réponse personnalisée selon les problèmes de santé, les antécédents médicaux et les traitements de chacun. व्य.स.सदस्य भोजराम कापगते,शाळेचे मुख्याध्यापक एस.आर.फूंडे, पदवीधर संदीप तिडके, विषय शिक्षक भास्कर नागपुरे, नितीन अंबादे ,कु.एस.टी.कापगते मॅडम ग्रामसेवक पटले उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!