AGM News24

Latest Online Breaking News

प्रवाशी विमान वाहतुकीसंदर्भात खा. सुनील मेंढे यांनी घेतली आढावा बैठक

By-AGM न्यूज 24

गोंदिया : मार्च महिन्यात गोंदिया येथील विमानतळावरून सुरू होणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात आढावा घेण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी आज गोंदिया येथे महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने काही सूचना खासदारांनी केल्या.

प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने बिरसी विमानतळावर आवश्यक असलेल्या सुविधा जवळपास पूर्ण झालेले आहेत. शिल्लक असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावे असे यावेळी खासदारांनी सांगितले. जमीन अधिग्रहणाच्या संदर्भातील सर्व 23 मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जमीन अधिग्रहणाच्या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनाला सादर करण्यात यावा असे निर्देशही यावेळी खासदारांनी दिले.

पुनर्वसनाच्या कामाला गती देण्यात यावी. घर बांधण्या संदर्भात विमानतळ प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, असेही यावेळी सांगण्यात आले.बैठकीला जिल्हाधिकारी नयना गुंडे, उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील, विमान पतन अधिकारी बैजू, सदस्य गजेंद्र फुंडे, डॉ. प्रशांत कटरे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी पाटील मॅडम, पदाधिकारी व अन्य अधिकारी गण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!