AGM News24

Latest Online Breaking News

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रिडा गुण – वर्षा गायकवाड

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रिडा स्पर्धेतील सहभागच्या आधारावर सवलतीचे गुण देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्धा गायकवाड यांनी दिली आहे. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बांधीत होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परिक्षेत प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवी मध्ये विद्यार्थ्यांच्या क्रिडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेत त्यांना 2021-22 या वर्षाकरिता सवलतीचे क्रिडा गुण देण्यात यावेत. तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावी दहावी मधील विद्यार्थाच्या क्रिडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेत त्यांना 2021-22 या वर्षाकरिता सवलतीचे क्रिडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे प्रा. वर्धा गायकवाड यांनी सांगितले आहे ही सवलत केवळ 2021-22 च्या परिक्षेकरीताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!