AGM News24

Latest Online Breaking News

ग्रामीण रुग्णालयात विनामूल्य दंत व रोग निदान शिबिराचे आयोजन.

AGM न्यूज 24, सडक अर्जुनी, गोंदिया.दि.21

सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात 21 फेब्रुवारी 22 ला चार दिवसीय 24 फेब्रुवारी 22 पर्यंत विनामूल्य दंत व रोग निदान, शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिराचे उद्घाटन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते नगराध्यक्ष तेजराम मडावी यांच्या अध्यक्षतेत धन्वंतरी मूर्तीचे पूजन करून करण्यात आले, यावेळी उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, जिल्हा परिषद सदस्य डॉ.भुमेश्र्वर पटले, चंद्रकला डोंगरवार, कु. कविता रंगारी, सुधा रहांगडाले, पंचायत समिती सदस्य चेतन वाळगाये,डॉ.रुकिराम वाढई, निशाताई कशिवार, शालींदर कापगते,वर्षा शहारे, शिवाजी गहाने, अल्लाहउद्दिन राजांनी, सपना नाईक, अनिल मुनिश्र्वर,रुग्ण कल्याण समिती सदस्य रजनी गिरहेपुंजे, कविता भीवगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबरीश मोहबे, डॉ.बालाजी जयस्वाल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत तुरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद भुते, दंत शल्य चिकित्सक डॉ. अनिल आटे, डॉ. दीपक धुमनखेडे, डॉ. डॉन पशीने, सहाय्यक अधीक्षक वामन शिवणकर व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आ. चंद्रिकापुरे यांनी रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या सोयीनुसार रुग्णालयातील समस्या सोडविण्याकरिता माझी कुठलीही मदत घेण्याकरिता संकोच न करता वरिष्ठांकडे पाठपुरावा करावा असे निर्देश दिले.

कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर अनिल आटे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर संकेत पर्शुरामकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!