AGM News24

Latest Online Breaking News

श्री. नंदकुमार अप्परमुख्य सचिव यांचेशी प्रगत शेतकऱ्यांचा संवाद

AGM न्यूज 24

सडक अर्जुनी,गोंदिया, दिनांक. २१: श्री.नंदकुमार अप्पर मुख्य सचिव (रोहयो) महाराष्ट्र शासन यांनी दि. १९/०२/२२ कोहमारा एरिया ५१ येथे गोंदियाजिल्ह्यातील प्रगत शेतकऱ्यांची शेती व्यवस्था पासून श्रीमंत कसे होता येईल या विषयावर संवाद साधला सदर संवाद कार्यक्रमात मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे समिती प्रमुख विधानमंडळ रोहयो समिती यांचे सौजन्याने आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, गोरेगांर तहसीलदार सचिन गोसावी, सडक-अर्जुनी तहसीलदार बागडे, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, लोकपाल गहाणे ,रमेश चू-हे,यशवंत गणवीर,किशोर तरोणे, श्रीकांत वाघाये गट विकास अधिकारी प.स सडक/अर्जुनी, दादा फुंडे, उपस्थित होते.

मा. आमदार यांनी प्रस्ताविकात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी परंपरागत धानाची शेती शिवाय अन्य नगदी पिके फळभाज्या, टरबूज, ऊस, यासारखी पिके घेण्यासाठी ते जिल्ह्यात कृषी अधिकारी या पदावर असताना प्रवृत्त केले होते व मागील १० वर्षात त्यांच्या आता परिणाम दिसत असुन अनेक शेतकऱ्यांनी, आधुनिक तंत्र तंत्रज्ञानाचा पिक पद्धती च्या अवलंब करून मोठ्या प्रमाणावर नगदी पिके घेवून सुम्रद्ध झाले असल्याचे नमूद केले. आता शेतकऱ्यांना नरेगा च्या माध्यमातून अधिक सुविधा व पूरक साधने सर्वसामान्य शेतकऱ्यांना पुरविण्याबाबतची अपेक्षा व्यक्त केली.याशिवाय धान्य शेती सोबतच त्याच पाण्यात मत्स्यपालन करण्याची योजना तयार करण्यात यावी व शेतकऱ्यांनी सुद्धा पावसाळ्यात धान्याची शेतीत मत्स्यबीज टाकून तीन महिन्यात मत्स्य उत्पादन करावे व अतिरिक्त नफा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

रोहयोच्या योजनांचा लाभ घेवून अल्पभूधारक शेतकरी लखपती व कारपती कसे व्हावा या उद्देशाने योजनाची आखणी करण्यात आली असून त्यांचा फायदा राज्यातील काही शेतकऱ्यांनी घेतला असून लखपती झाल्याचे उदाहरणासह सांगितले. शेंद्रिय शेती करून जमिनीची सुपीकता वाढविणे पाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले व पुढेही नियमित संवाद साधण्यात येण्याबाबत आश्वासित केले. रोहयो कामे तत्काळ ऑनलाइन मजूर करण्याबाबत उपस्थित कार्यन्वीय यंत्रणांचे जिल्ह्यप्रमुखांना सुचना दिल्या.

उपस्थित प्रगत शेतकऱ्यांनी त्यांची यशोगाथा सांगितली व शेती विषयक योजना प्रत्यक्षात कशा असव्यात याबाबत सूचना केल्या सदर संवाद कार्यक्रमात अर्जुनी/मोरगांव, सड़क/अर्जुनी, गोरेगांव तालुक्यातील प्रगत शेतकरी व सबंधित यंत्रणा चे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!