AGM News24

Latest Online Breaking News

डव्वा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न

सडक-अर्जुनी, गोंदिया, दिनांक. १९ : डव्वा येथे स्वराज्य संस्थेचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. जैन राईस मिलच्या बाजूला खुल्या जागेत शामियाना टाकून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाला जि. प.सदस्य डॉ.भुमेश्वर पटले, पं. स.सदस्य चेतनभाऊ वडगाये,शालिंदरजी कापगते,सरपंच सौ.पुष्पमाला बडोले,छायाताई चव्हाण,प्रतिष्ठित नागरिक एफ आर. टी.शहा साहेब,सरपंच दिनेशजी हुकरे, निशांतजी राऊत,विलासभाऊ चव्हाण,पुष्पाताई खोटेले, अनीलजी बिलिया,चेतन नागपुरे, प्रा.भोयर,मनोज राऊत,हितेंद्र बडोले, झामाजी चौधरी,हुमनराव चौधरी,नोकेश कुरसुंगे,मंगलाताई कुरसुंगे, मायाताई चौधरी,नरेश प्रधान, ग्रा.पं.सदस्य सचिन रहांगडाले,विजय चौधरी,सूर्यभान उंदिरवाडे,सविताताई प्रधान,छायाताई येल्ले हजर होते.उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी केलेले कल्ल्यानकारी कार्य,त्यांचे जीवनातील असंख्य प्रसंगावर तसेच ते सर्व समाजाचे सम्राट का होते,त्यांनी महिलांना समानतेची वागणूक कशी दिली या सर्व बाबीवर मार्गदर्शन केले.

त्यांना रयतेचा जाणता राजा का म्हटल्या जायचे यावर माहिती देण्यात आली.याप्रसंगी गावातून मिरवणूक काढण्यात आली. झाकी मध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भूमिकेत सिने कलावंत “दिपमबडोले” यांनी शिवाजी महाराजांचे वेश परिधान करून शिवाजी महाराजांचे दर्शन घडवीले.

मिरवणुकीत शेकडो महिला,पुरुष, मुलांनी सहभाग घेतला होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!