AGM News24

Latest Online Breaking News

ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

गोरेगाव, गोंदिया, दिनांक. १९: ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार येथे दिनांक 19 फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.तसेच शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सौ.शितल सुरेंद्र(बबलु)बिसेन यांचे स्वागत व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

रयेतेच्या मनावर,मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सुमेंद्र धमगाये हे होते. प्रमुख अतिथि नवनिर्वाचित जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत,नवनिर्वाचित पं.स. सदस्य सौ. शितलताई सुरेंद्र(बबलु)बिसेन, माजी पंचायत समिती उपसभापती सुरेंद्र(बबलु)बिसेन,उपसरपंच जावेद (राजाभाई)खान,सचिव अरविंद साखरे,तंमुस अध्यक्ष गिरिश पारधी,माजी तंमुस अध्यक्ष नामदेव नेवारे, वनव्यवस्थापन अध्यक्ष टुकेंद्र भगत,तंमुस सदस्य ज्ञानेश्वर राऊत,ग्रा. पं.सदस्य छंदीप ठाकुर,ग्रा.पं. सदस्य चंद्रगुप्त धमगाये, ग्रा.पं सदस्या शिला चौधरी,ग्रा.पं.सदस्या छाया चौधरी, ग्रा.पं. सदस्या छाया बिसेन, भाजप विद्यार्धी मोर्चा युवा अध्यक्ष सरफराज शेख,सामाजिक कार्यकर्ता विजय येळे आदी उपास्थित राहुण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला लक्ष्मण राहांगडाले, प्रल्हाद चौधरी,आशुतोष काठेवार,युनुस पठाण,ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर,,ग्राम पंचायत लिपीक सुनिल वाघाडे, ग्राम पंचायत परिचर अजय नेवारे यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्राम पंचायत परिनक संघचालक रोहित पांडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!