AGM News24

Latest Online Breaking News

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल गोंदिया येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

AGM News 24

गोंदिया, दिनांक. १९ /२ /२०२२ : पोद्दार इंटरनॅशनल स्कूल गोंदिया येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील प्राचार्य श्री. महेंद्र जगदाळे सर तर प्रमुख पाहुणे श्री. रवी जयस्वाल (ऐ. ओ) श्रीमती. सुमन खंडेलवाल मॅम(पी. जे. के मुख्याध्यापिका ) तसेच सर्व शिक्षक वृंद व शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले.

त्यानंतर शाळेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी काढण्यात आली. नंतर शाळेतील काही शिक्षक शिक्षीका आणि यांनी मिळून पोवाडा गीत साजरा केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम भाषण, गीत घेण्यात आले. इयत्ता दहावीचा विद्यार्थी गुनीत होरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील कामगिरीबद्दल माहिती दिली तर लय सोनी इयत्ता दहावी या विद्यार्थ्यांने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य विषयी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील प्राचार्य श्री. महेंद्र जगदाळे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे संचालन वर्ग दहावीची विद्यार्थी हिमांशी तायडे आणि नम्रता कवास यांनी केले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक वृंद, इतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!